सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:16 IST2026-05-12T20:14:44+5:302026-05-12T20:16:08+5:30
Deputy CM Sunetra Pawar In Guwahati: सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली, असे सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
Deputy CM Sunetra Pawar In Guwahati:आसाममधील मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्या आयोजित शपथविधी सोहळ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी गुवाहाटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर सुनेत्रा अजित पवार यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक वारशाचा आधारस्तंभ असलेले दिवंगत शरतचंद्र सिन्हा यांच्या पुतळ्याला वंदन केले.
राज्यसभा खासदार पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक हे उपस्थित होते. कार्यालयात झालेल्या या संवादादरम्यान सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आसाममधील महिलांशी सौहार्दपूर्ण चर्चा केली. या संवादादरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचा आदर्श, संघर्ष आणि संघटनात्मक वारसा देशभरात पसरवण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.
आसाममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत होईल
या संवादादरम्यान खासदार पार्थ पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि युवक कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि संघटनात्मक बाबीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी भविष्यात ईशान्य भारतासह आसाममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पार्थ पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आसाममधील कामाख्या देवी मंदिर येथे जाऊन आदिशक्ती माता कामाख्या देवीचे पवित्र दर्शन घेतले. नीलाचल पर्वतावर वसलेल्या या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशी आत्मीय संवाद साधला, असे सुनेत्रा पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज आसाममधील कामाख्या देवी मंदिर येथे जाऊन आदिशक्ती माता कामाख्या देवीचे पवित्र दर्शन घेतले. नीलाचल पर्वतावर वसलेल्या या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री मा.श्रीमती रेखा गुप्ता… pic.twitter.com/LBDd3Bg8j8
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 12, 2026