GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)

शुभमन गिल पाठोपाठ बटलरला दाखवला तंबूचा रस्ता

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 20:49 IST2026-05-12T20:48:54+5:302026-05-12T20:49:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 GT vs SRH Praful Hinge Take Two Wickets In The Powerplay Shubman Gill And Jos Buttler Wach Video | GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)

GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर घरच्या मैदानात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाविरुद्धच्या सामन्यातत सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून विदर्भकर प्रफुल हिंगे याने पॉवर प्लेमध्ये हवा केली. गुजरातच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या पहिल्या षटकात त्याने शुभमन गिलच्या रुपात पहिले यश मिळवले. त्यानंतर  सहाव्या षटकात प्रफुलनं त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जोस बटलरलाही तंबूचा रस्ता दाखवला. विदर्भकरासमोर गुजरातच्या ताफ्यातील दोन्ही स्टार बॅटर्सला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शुभमन गिलच्या रुपात पहिली विकेट
 
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलनं साई सुदर्शनच्या साथीनं गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात केली. पण अनकॅप्ड प्रफुल हिंगेनं आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर टीम इंडियाच्या प्रिन्सला अवघ्या ५ धावांवर क्लासेनकरवी झेलबाद केले. 

विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर

...अन् अंपायरला निर्णय बदलावा लागला!

गिल स्वस्तात माघारी फिरल्यावर गुजरात टायटन्स संघाची मदार ही जोस बटलरच्या खांद्यावर होती. पण पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रफुल हिंगेनं त्याचाही करेक्ट कार्यक्रम केला. ही विकेट त्याने आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवली. सहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बॅटची किंचित कड घेऊन चेंडू यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात विसावला. प्रफुलनं अपील केली, पण त्याला विकेट किपरची साथ मिळाली नाही. अंपायरनं दाद न दिल्याने युवा गोलंदाजाने आत्मविश्वासाने पॅट कमिन्सला रिव्ह्यू घेण्यासाठी मनवले. अखेरच्या ३० सेकंदात कमिन्सनं रिव्ह्यू घेतला आणि बटलर आउट असल्याचे चित्र स्पष्ट झाले. मैदानातील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. प्रफुलच्या खात्यात दुसरी विकेट जमा झाली.

पदार्पणाच्या हंगामात लक्षवेधी कामगिरी

प्रफुल हिंगे याने आपल्या दुसऱ्या षटकात खर्च केलेल्या २ चौकाहासह पहिल्या दोन षटकात फक्त १० धावा खर्च करत पॉवर  प्लेमध्ये दोन विकेट्स घेत संघाला दमदार सुरुवात करून दिली. पदार्पणाच्या सामन्यात ३४ धावा खर्च करून ४ विकेट्सचा डाव साधत इतिहास रचणाऱ्या प्रफुलनं यंदाच्या हंगामातील पहिल्या चार सामन्यात ८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. GT विरुद्ध पाचव्या सामन्यात संधी मिळताच त्याने पुन्हा एकदा गोलंदाजीतील धार दाखवून देताना पहिल्या दोन षटकांतील स्पेलमध्ये २ विकेट्स घेत १० विकेट्सचा आकडा गाठला.

Web Title : GT vs SRH: हिंगे का पावरप्ले कहर, 2 विकेट, अंपायर का फैसला पलटा

Web Summary : प्रफुल हिंगे की शानदार गेंदबाजी से गुजरात टाइटन्स परेशान, शुभमन गिल और जोस बटलर के महत्वपूर्ण विकेट लिए। उनके आत्मविश्वासपूर्ण अपील से अंपायर को फैसला बदलने पर मजबूर होना पड़ा।

Web Title : Hinge's Powerplay Spell: Two Wickets, Forces Umpire Decision Change in GT vs SRH

Web Summary : Praful Hinge's impressive powerplay bowling rattled Gujarat Titans, claiming two crucial wickets, including Shubman Gill and Jos Buttler. His confident appeal led to a successful review, overturning the umpire's initial decision.