विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर

युझवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही? सामन्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 01:27 IST2026-05-12T01:25:20+5:302026-05-12T01:27:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs DC Shreyas Iyer Answer Who Is Responsible For Loss Of Punjab Kings vs Delhi Capitals In Marathi News | विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर

विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर

पंजाब किंग्सच्या संघाला धर्मशाला येथील येथील घरच्या मैदानात यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना  गोलंदाजीसह खराब क्षेत्ररक्षणाचा पुन्हा एकदा पंजाबच्या संघाला फटका बसला. या पराभवासह आता पहिल्या सात सामन्यात अपराजित राहिलेला संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत मागे पडला आहे. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ३० धावा अधिक काढूनही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे कमी पडल्याचे स्पष्ट सांगितले. यावेळी त्याने युझवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही? याचंही उत्तर दिले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर श्रेयस अय्यर नाराज

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या पराभवाला गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले. सामन्यानंतर ब्रॉडकास्टर्सशी बोलताना तो म्हणाला, "मी गोष्ट फिरवून सांगणार नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. या खेळपट्टीवर आम्ही किमान ३० धावा जास्त केल्या होत्या. चेंडू सीम होत होता तसेच उसळीही घेत होता"

PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'

युजवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही?

या सामन्यात युजवेंद्र चहल याला श्रेयस अय्यरने एकही षटक दिले नाही. याबाबत विचारले असता अय्यर म्हणाला, "माझ्या मनात तो विचार नक्कीच होता. पण खेळपट्टीवर सीमर्सला मदत मिळत होती. जर आमच्या गोलंदाजांनी योग्य लाइन-लेंथसह गोलंदाजी केली असती, तर विकेट्स मिळू शकल्या असत्या. दुर्दैवाने आम्हाला ते जमलं नाही."

गुणतालिकेत पंजाब चौथ्या स्थानी

पंजाब किंग्सचा संघाने पहिल्या सात सामन्यात सहा विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह यंदाच्या मोहिमेत अगदी दिमाखदार सुरुवात केली. पण आता सलग चौथ्या पराभवामुळे प्लेऑफ्सच्या शर्यतीत ते चौथ्या स्थानावर आहेत. मागील चारही सामन्यात क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे. ११ सामन्यानंतर त्यांच्या खात्यात १३ गुण जमा असून आघाडीच्या चारमधील स्थान कामय ठेवण्यासाठी पंजाबच्या संघाला ३ पैकी किमान दोन सामने जिंकावे लागतील. 
 

Web Title : पीबीकेएस की लगातार चौथी हार: श्रेयस ने बताई फील्डिंग, गेंदबाजी की विफलताएं

Web Summary : पंजाब किंग्स को खराब क्षेत्ररक्षण और गेंदबाजी के कारण लगातार चौथी हार का सामना करना पड़ा, जबकि पर्याप्त रन बनाए थे। कप्तान श्रेयस अय्यर ने टीम की कमियों को संबोधित करते हुए बताया कि युजवेंद्र चहल को ओवर क्यों नहीं दिया गया। टीम अब अंक तालिका में चौथे स्थान पर है।

Web Title : PBKS Loses Fourth Straight: Shreyas Explains Fielding, Bowling Failures

Web Summary : Punjab Kings suffered their fourth consecutive loss due to poor fielding and bowling, despite scoring enough runs. Captain Shreyas Iyer addressed the team's shortcomings, explaining why Yuzvendra Chahal wasn't given an over. The team now stands fourth in the points table.