देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती केली तरी पाहिजे त्या प्रमाणात मोबदला दिला जात नाही. ही रक्कम खात्यात तातडीने जमा करावी, या मागणीसाठी चांदूर बाजार तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयावर धडक दिली. ...
देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. ...