इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:56 IST2026-05-13T12:53:35+5:302026-05-13T12:56:01+5:30

इराणने बंद केलेली होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी युक्रेन अमेरिकेला मदत करणार आहे.

Ukraine will break Iran's blockade! America has 'Brahmastra'; Now a bloodbath in Hormuz? | इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?

इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?

इराणसोबतच्या युद्धात अडकलेल्या अमेरिकेसाठी आता युक्रेन एका संकटमोचकाच्या भूमिकेत समोर आला आहे. होर्मुजची सामुद्रधुनी इराणच्या तावडीतून सोडवण्यासाठी युक्रेनने अमेरिकेला विशेष ड्रोन आणि रोबोटिक तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली आहे. पेंटागन आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात एक मोठी डील अंतिम टप्प्यात असून, यामुळे आखाती देशांमधील युद्धाचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

युक्रेनची मदत अमेरिकेसाठी गेम चेंजर ठरणार?

युक्रेनने रशियाविरुद्धच्या युद्धात जे तंत्रज्ञान वापरून यश मिळवले, तेच आता अमेरिका इराणविरुद्ध वापरणार आहे. 

१. काळ्या समुद्राचा अनुभव 

२०२२ मध्ये रशियाने काळ्या समुद्रात अशाच प्रकारे नाकाबंदी केली होती. त्यावेळी युक्रेनने आपल्या स्वस्त आणि घातक समुद्री ड्रोनच्या साहाय्याने ही नाकाबंदी तोडून रशियन जहाजांना पळता भुई थोडी केली होती. तोच यशस्वी पॅटर्न आता होर्मुझमध्ये राबवला जाणार आहे.

२. स्वस्त पण 'लयभारी' तंत्रज्ञान

युक्रेनने विकसित केलेले ड्रोन अमेरिकन ड्रोनच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहेत. इराणने आपल्या 'शाहेद' ड्रोनच्या साहाय्याने अमेरिकेचे मोठे नुकसान केले होते. आता युक्रेनच्या या स्वस्त ड्रोन्समुळे अमेरिका कमी खर्चात इराणला चोख प्रत्युत्तर देऊ शकणार आहे.

३. इराणच्या शस्त्रांची नस माहिती

रशिया युक्रेनविरुद्ध इराणचेच 'शाहेद' ड्रोन वापरत आहे. त्यामुळे या ड्रोनना कसं पाडलं जाऊ शकतं आणि इराणच्या युद्धनीतीला कसं शह देता येतो, याचा सर्वाधिक अनुभव सध्या युक्रेनकडे आहे. हा अनुभव अमेरिकेसाठी लाखमोलाचा ठरणार आहे.

४. जमिनीवरील युद्धासाठी 'रोबोट्स'

होर्मुझ उघडण्यासाठी जमिनीवर सैन्य उतरवणे धोक्याचे ठरू शकते, असे अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचे मत आहे. अशा वेळी युक्रेनने दिलेले 'वॉर रोबोट्स' अमेरिकन सैनिकांचा जीव वाचवून इराणच्या तळांवर हल्ला करण्यास सक्षम असतील.

होर्मुझचं महत्त्व आणि इराणची टोलची अट

होर्मुझ ही जगातील सर्वात महत्त्वाची व्यापारी जलवाहिनी आहे, जिथून जगातील २५ टक्के तेल आणि गॅसचा पुरवठा होतो. इराणने सध्या हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक केला असून, तिथून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करण्याची अट घातली आहे. अमेरिका ही अट मान्य करण्यास तयार नाही, म्हणूनच आता ताकदीचा वापर करून हा मार्ग मोकळा करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Web Title : ईरान की नाकेबंदी यूक्रेन तोड़ेगा! अमेरिका को मिला 'ब्रह्मास्त्र'; होर्मुज में रक्तपात?

Web Summary : यूक्रेन की तकनीक, जो रूस के खिलाफ सिद्ध हुई, होर्मुज में ईरान का मुकाबला करने में अमेरिका की मदद कर सकती है। ड्रोन, रोबोट और ईरानी ड्रोन का मुकाबला करने की विशेषज्ञता लागत प्रभावी समाधान प्रदान करते हैं। इस सौदे से खाड़ी की शक्ति गतिशीलता बदल सकती है।

Web Title : Ukraine to break Iran's blockade! US gets 'Brahmastra' in Hormuz?

Web Summary : Ukraine's technology, proven against Russia, may help the US counter Iran in Hormuz. Drones, robots, and expertise in countering Iranian drones offer cost-effective solutions. This deal could reshape the Gulf's power dynamics.