Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...

‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...

प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:27 IST2026-05-13T13:26:32+5:302026-05-13T13:27:19+5:30

प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.

Rumors of 'all international flights closed' are false; Air India gives clarification, but | ‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...

‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...

Air India ने जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले. तसेच, प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले.

एअर इंडियाने काय सांगितले?

एअर इंडिया न्यूजरूमच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'काही प्लॅटफॉर्म्सवर एअर इंडियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे दावे पूर्णपणे चुकीचे आणि बनावट आहेत.' अलिकडच्या काळात काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांमध्ये कपात करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर विविध अटकळी सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कंपनीला अधिकृत स्पष्टीकरण द्यावे लागले.

पूर्ण बंद नाही, फक्त काही मार्गांवर तात्पुरती कपात

एअर इंडियाने स्पष्ट केले की, सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आलेली नाहीत, केवळ काही मार्गांवर तात्पुरती कपात करण्यात आली आहे. वाढता इंधन खर्च आणि ऑपरेशनल दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी दिल्लीहून शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय या शहरांकडे जाणारी काही उड्डाणे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. तसेच काही इतर मार्गांवर उड्डाणांची संख्या कमी करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या एअरस्पेस बंदीचा मोठा परिणाम

दरम्यान, पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्यानंतर एअर इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक उड्डाणांना आता लांब मार्गाने जावे लागत आहे. यामुळे इंधन खर्च वाढत आहे, उड्डाणांचा कालावधी वाढत आहे आणि क्रूवरील खर्चातही वाढ होत आहे. काही उत्तर अमेरिकन उड्डाणांना व्हिएन्ना आणि स्टॉकहोम येथे तांत्रिक थांबे घ्यावे लागत असल्याने ऑपरेशनल खर्चात आणखी वाढ झाली आहे.

जेट इंधन दरात मोठी वाढ

जागतिक स्तरावर जेट फ्यूलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मे २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात जेट फ्यूलची सरासरी किंमत प्रति बॅरल १६२.८९ डॉलरवर पोहोचली. फेब्रुवारी अखेरीस ही किंमत ९९.४० डॉलर प्रति बॅरल होती. एअरलाइन उद्योगात इंधन खर्च हा एकूण ऑपरेशनल खर्चाचा मोठा हिस्सा असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचे

एअर इंडियाच्या स्पष्टीकरणानंतर प्रवाशांमध्ये निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर झाला आहे. कंपनीने सर्व सेवा बंद केल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी पुढील काही महिन्यांत काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर कमी उड्डाणे, वाढलेले तिकीट दर आणि जास्त प्रवास वेळ लागू शकतो. 

Web Title : एयर इंडिया ने उड़ान रद्द अफवाहों का खंडन किया, मार्ग समायोजन का हवाला दिया

Web Summary : एयर इंडिया ने अंतरराष्ट्रीय उड़ान रद्द करने की अफवाहों का खंडन किया। ईंधन की बढ़ती लागत और परिचालन दबाव के कारण कुछ मार्गों पर अस्थायी कटौती। यात्रियों को आधिकारिक स्रोतों पर निर्भर रहना चाहिए, क्योंकि समायोजन यात्रा समय और किराए को प्रभावित करते हैं।

Web Title : Air India Denies Flight Cancellation Rumors, Cites Route Adjustments

Web Summary : Air India refuted rumors of international flight cancellations. Some routes face temporary cuts due to rising fuel costs and operational pressures. Passengers should rely on official sources for updates, as adjustments impact travel times and fares.