शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:04 IST2026-05-10T16:47:59+5:302026-05-10T17:04:19+5:30

देशांर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अपेक्षेपेक्षाही चांगले निकाल, यांमुळे बाजाराला बळकटी मिळाली...

शेअरबाजारात गेल्या आठवड्यात बराच चढ-उतार दिसून आला. जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे सावट आणि विदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) सातत्याने होणारी विक्री, अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजारात सकारात्मकता दिसून आली.

देशांर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अपेक्षेपेक्षाही चांगले निकाल, यांमुळे बाजाराला बळकटी मिळाली. यामुळे, गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ४१४.६९ अंकांनी वधारून ७७३२८.१९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७८.६ अंकांची वाढून २४,१७६.१५ वर पोहोचला.

या आठवड्यात ५ शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आणि सर्वांचेच लक्ष वेधले. या शेअर्सनी केवळ ५ दिवसांतच ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा दिला. यांमध्ये ओमेक्स ऑटोच्या शेअरने तर सर्वांनाच थक्क केले.

ओमेक्स ऑटोचा शेअर गेल्या आठवड्यात १३१.५९ रुपयांवरून थेट २३७.४० रुपयांवर पोहोचला. अर्थात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना ८०.४१% एवढा बंपर परतावा दिला.

याच बरोबर, कॅलिफोर्निया सॉफ्टवेअरचा शेअर गेल्या आठवड्यांत १४.२० रुपयांवरून २३.८० रुपयांवर पोहोचला. याने आपल्या गुंतवणूकदारांना ६७.६१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

याच यादीतील मित्सु केम प्लास्टने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या आठवड्यात ५२.५६% एवढा बंपर परतावा दिला. हा शेअर गेल्या आठवड्यात १११.५० रुपयांवरून १७०.१० रुपयांवर पोहोचला. या शेअरने शुक्रवारीही ६.७५ टक्क्यांनी वधारला.

या यादीतील पाचवा शेअर म्हणजे अनुरूप पॅकेजिंगचा. या शेअरने गेल्या आठवड्यात १०.९९ रुपयांवरून १६.१४ रुपयांपर्यंत मजल मारली. अर्था गेल्या आठवड्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना ४६.८६% परतावा दिला.

प्लाझा वायर्सच्या शेअरनेही गेल्या आठवड्यात ४६.९१% एवढा परतावा दिला. हा शेअर गेल्या आठवड्यात ४०.८४ रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, बाजारातील अस्थिर परिस्थितीतही या छोट्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जबरदस्त परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)