Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:24 IST2026-05-10T15:21:37+5:302026-05-10T15:24:08+5:30

कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर अज्ञात शस्त्राने हल्ला करण्यात आला असून परिसरात तणाव वाढला आहे.

Persian Gulf Tension: Another bloodbath at sea? Missile attack on British ship near Qatar coast | Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या पर्शियन आखातात जहाजांवरील हल्ल्यांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. रविवारी कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या एका मालवाहू जहाजावर अज्ञात शस्त्राने हल्ला करण्यात आला, ज्यानंतर जहाजाला भीषण आग लागली. ब्रिटनच्या समुद्री सुरक्षा एजन्सी 'UKMTO'ने या घटनेची पुष्टी केली असून, यामुळे या भागात पुन्हा एकदा युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

नेमकी घटना काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, हे जहाज कतारची राजधानी दोहापासून सुमारे ४३ किमी उत्तर-पूर्वेला समुद्री मार्गावरून जात असताना हा हल्ला झाला. अज्ञात शस्त्राने किंवा 'प्रोजेक्टाईल'ने या जहाजाला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली होती, मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

युद्धविराम असूनही होर्मुजमध्ये तणाव कायम

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम लागू झाल्यानंतरही या भागात तणाव कायम आहे. गेल्या आठवडाभरात फारसच्या खाडीत अनेक जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणचे दोन तेल टँकर रोखण्याचा प्रयत्न केला होता, ज्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने थेट अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. हा ताजा हल्ला देखील याच संघर्षाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

भारतीय जहाजालाही बसला होता फटका

समुद्री चाचेगिरी आणि हल्ल्यांच्या या मालिकेत भारताच्या एका जहाजाचेही नुकसान झाले आहे. ८ एप्रिल रोजी होर्मुज सामुद्रधुनीजवळ लाकडी भारतीय जहाजाला आग लागली होती. या भीषण अपघातात १८ भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय चिनी तेल टँकरवरही अशाच प्रकारचा हल्ला झाल्याने व्यापारी जहाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जगाची चिंता वाढली

पर्शियन खाडी आणि होर्मुज सामुद्रधुनी हे जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. या मार्गावर सतत होणारे हल्ले जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. कतारजवळ झालेल्या या हल्ल्याचा तपास सुरू असून, यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध 'UKMTO' आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणा घेत आहेत.

Web Title : फ़ारस की खाड़ी में तनाव: कतर के पास यूके जहाज पर हमला

Web Summary : कतर के पास एक यूके कार्गो जहाज पर हमला हुआ, जिससे फारस की खाड़ी में फिर से संघर्ष की आशंका बढ़ गई है। युद्धविराम के बावजूद, एक भारतीय जहाज सहित जहाजों पर हाल के हमलों के साथ तनाव अधिक बना हुआ है। वैश्विक आर्थिक चिंताओं के बीच यूकेएमटीओ द्वारा घटना की जांच की जा रही है।

Web Title : Tensions Rise in Persian Gulf: UK Ship Hit Near Qatar

Web Summary : A UK cargo ship was attacked near Qatar, raising fears of renewed conflict in the Persian Gulf. Despite a ceasefire, tensions remain high with recent attacks on vessels, including an Indian ship. The incident is under investigation by UKMTO amid global economic concerns.