ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय

Australian Cricket News: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि तेथील क्रिकेटपटू हे फार पूर्वीपासून व्यावसायिकतेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटची अवस्थाही पाकिस्तानच्या पीसीबीप्रमाणे होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पगारावरून नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:04 IST2026-05-10T14:50:35+5:302026-05-10T15:04:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Cricket Australia: Australian cricket in a similar situation to Pakistan, dispute over contract, players and board face to face, decision taken by 5 cricketers | ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय

ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि तेथील क्रिकेटपटू हे फार पूर्वीपासून व्यावसायिकतेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटची अवस्थाही पाकिस्तानच्या पीसीबीप्रमाणे होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पगारावरून नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे. बिग बॅश लीगचं खाजगीकरण करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. तसेच ही चिंता या स्पर्धेच्या भवितव्यापुरती मर्यादित राहता ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये व्यापक प्रमाणावर पसरली आहे.

सुरुवातीला ही बाब बिग बॅशसमोरील  एका आर्थिक आव्हानापुरती मर्यादित होती. मात्र आता ऑस्ट्रेलियन संघातील खेळांडूंचा संयम आता सुटत चालला आहे.  यासंदर्भात समोर आलेल्या एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या नव्या नॅशनल कॉन्ट्रॅक्टवर सह्या केलेल्या नाहीत. त्यात अनेक कारणांचा समावेश आहे.

यामधील पहिलं कारण आहे ते म्हणजे या करारामधून घालण्यात  आलेल्या आर्थिक अटींबाबतची नाराजी हे आहे. खेळाडूंना एनओसी घेऊन परदेशी फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी मिळत असलेलं स्वातंत्र्य, हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन खेळाडू हे  लीग  क्रिकेटपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला  महत्त्व देत असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे इतर अनेक देशांपासून वेगळं राहिलं होतं.  मात्र आता हे संतुलन  ढळताना दिसत आहे.  

Web Title : ऑस्ट्रेलियाई क्रिकेट संकट में: अनुबंध विवाद, खिलाड़ी विद्रोह, पाकिस्तान की तरह।

Web Summary : ऑस्ट्रेलियाई क्रिकेट खिलाड़ी नए अनुबंध शर्तों से नाखुश हैं। वेतन और विदेशी लीग भागीदारी पर विवाद अशांति पैदा कर रहे हैं। खिलाड़ियों ने अनुबंध पर हस्ताक्षर नहीं किए हैं, जो पाकिस्तान के पीसीबी मुद्दों को दर्शाता है, जिससे स्थिरता को खतरा है।

Web Title : Australian cricket in crisis: Contract disputes, player revolt, mirroring Pakistan.

Web Summary : Australian cricketers are unhappy with new contract terms. Disputes over pay and foreign league participation are causing unrest. Players haven't signed contracts, mirroring Pakistan's PCB issues, threatening stability.