जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:58 IST2026-05-10T15:57:16+5:302026-05-10T15:58:00+5:30
Vande Mataram In दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...
दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. तसेच या माध्यमातून टीव्हीके आणि विजय यांनी भाजपाच्या हातून एक मोठा मुद्दा हिसकावल्याचं बोललं जात आहे.
आज झालेल्या विजय यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहा कडव्यांचे वंदे मातरम हे गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाजवण्यात आले. एकीकडे वंदे मातरमबाबतभाजपाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. तर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी वंदे मातरम् या गीताला विरोध करत ते न वाजवण्याचे आदेश दिलेले होते. त्यात काल पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भाजपाच्या सरकारच्या शपथविधीवेळीही वंदे मातरम हे गीत वाजवले गेले नव्हते. मात्र विजय यांच्या शपथविधीमध्ये पूर्ण वंदे वाजवण्यात आल्याने या निर्णयाची आता चर्चा होत आहे.
विजय यांच्या शपथविधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हेही मंचावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम हे गीत वाजवण्यात आले. त्यानंतर जन गण मन... हे राष्ट्रगीत आणि तमिल थाई वल्थू हे तामिळनाडूचे राज्यगीत वाजवण्यात आले. सर्वसाधारणपणे तामिळनाडू सरकारच्या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक प्रमाणे तमिल थाई... हे गीत वाजवले. जाते. मात्र विजय यांच्या शपथविधीवेळी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अनेक स्वातंत्र्यसैनिकांचं प्रेरणास्थान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताची रचना प्रसिद्ध बंगाली लेखक, कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती. मात्र काल झालेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात हे गीत वाजवण्यात आले नव्हते. मात्र विजय यांच्या शपथविधी वेळी हे गीत वाजवून वंदे मातरमसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या भाजपाची कोंडी केल्याचे बोलले जात आहे.