Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी

उर्विल पटेलचा धमाका! जलद अर्धशतकी खेळीसह रचला नवा इतिहास

By सुशांत जाधव | Updated: May 10, 2026 18:31 IST2026-05-10T18:29:25+5:302026-05-10T18:31:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs LSG Urvil Patel Equals Yashasvi Jaiswal Record For The Fastest 50 In IPL History | Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी

Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी

Urvil Patel Equals Yashasvi Jaiswal's Record Of Scoring Fastest 50 In IPL : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील स्फोटक बॅटर उर्विल पटेल याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना IPL मधील सर्वात जलद अर्धशतकी खेळी साकारली. १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना त्याने यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरीचा डाव साधला. लखनौच्या संघाने दिलेल्या २०४ धावांचा धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन स्वस्तात माघारी फिरल्यावर पॉवर प्लेमध्ये उर्विल पटेलचा धमाकेदार शो पाहायला मिळाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

उर्विल पटेलचा मोठा धमाका; सर्वात जलद अर्धशतकासह साधली यशस्वीच्या विक्रमाशी बरोबरी

२७ वर्षी उजव्या हाताच्या बॅटरनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर पहिल्या चेंडूपासून आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना १ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या खेळीसह IPL इतिहासात सर्वात जलद अर्धशकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वालसह तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी पोहचला आहे. २०२३ च्या हंगामात यशस्वी जैस्वाल याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव

युवीचा विक्रम मोडण्याची होती संधी, पण...

उर्विल पटेल याने पहिल्या ८ चेंडूंमध्ये ६ षटकाराच्या मदतीने ४२ धावा चोपल्या होत्या. त्यामुळे युवराज सिंगचा १२ चेंडूंतील जलद अर्धशतकाचा विक्रम धोक्यात आला होता. पण पॉवरप्लेनंतर स्ट्रॅटेजिक टाइम-आउट झाल्याने उर्विलचा लय काहीशी बिघडली. पुढील ८ धावा करण्यासाठी त्याला ५ चेंडू खेळावे लागले. तरीही त्याने IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकवणारे खेळाडू

  • १३ चेंडू - उर्विल पटेल (चेन्नई सुपर किंग्स)
  • १३ चेंडू- यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स)
  • १४ चेंडू - केएल राहुल (पंजाब किंग्स)
  • १४ चेंडू - पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स)
  • १४ चेंडू  - रोमारियो शेफर्ड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
  • १५ चेंडू - यूसुफ पठाण (कोलकाता नाईट रायडर्स)

 

CSK कडून सर्वात जलद अर्धशतकी खेळीचा रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आता उर्विल पटेलच्या नावे झाला आहे. याबाबतीत त्याने सुरेश रैनाला मागे टाकले. रैनानं CSK च्या संघाकडून १६ चेंडूत अर्धशतक झळकावल्याचा रेकॉर्ड होता. 

  • १३ चेंडूत - उर्विल पटेल
  • १६ चेंडू - सुरेश रैना
  • १९ चेंडू - मोईन अली

Web Title : उर्विल पटेल का तूफानी अर्धशतक: सबसे तेज IPL रिकॉर्ड की बराबरी!

Web Summary : उर्विल पटेल ने 13 गेंदों में सबसे तेज IPL अर्धशतक लगाकर यशस्वी जायसवाल के रिकॉर्ड की बराबरी की। उनकी विस्फोटक पारी में एक चौका और सात छक्के शामिल थे, जिससे सैमसन के आउट होने के बाद लखनऊ के लक्ष्य का पीछा करते हुए चेन्नई का चेपॉक स्टेडियम गूंज उठा।

Web Title : Urvil Patel's Blazing Fifty: Equals Fastest IPL Record!

Web Summary : Urvil Patel smashed a record-equalling fastest IPL fifty in 13 balls, matching Yashasvi Jaiswal's feat. His explosive innings included one four and seven sixes, electrifying Chennai's Chepauk stadium during the Lucknow chase after Samson's dismissal.