IPL 2026 CSK vs LSG Josh Inglis Hits His Fastest Ever T20 Fifty : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सचा धडाकेबाज सलामीवीर जॉश इंग्लिस याने मोठा धमाका केला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करताना त्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. याशिवाय LSG च्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतकवीरांच्या यादीत तो निकोलस पूरन पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. पूरन याने LSG च्या संघाकडून निकोलस पूरन याने १५ आणि १६ चेंडूत अर्धशतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जॉश इंग्लिसचा धमाका, LSG सह त्याच्या नावे झाला खास विक्रम
जॉश इंग्लिसनं मिचेल मार्शच्या साथीनं संघाला धमाकेदार अंदाजात सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. पाचव्या षटकात मार्श १० चेंडूत १० धावा करून माघारी फिरल्यावर जॉशन आपला धमाकेदार शो कायम ठेवताना पॉवर प्लेमध्ये संघाच्या धावफलकावर ९१ धावा लावल्या. IPL इतिहासात लखनौच्या संघाची पॉवर प्लेमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय जॉश इंग्लिस हा पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा स्थानावर पोहचला. त्याने पहिल्या ६ षटकांच्या खेळात २५ चेंडूत ७७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घे...
पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
८७*(२५) - सुरेश रैना विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई, २०१४
८४*(२६) - ट्रॅविस हेड विरुद्ध दिल्ली कॅपिट्लस, दिल्ली, २०२४
७८*(२४) - जेक फ्रेसर-मॅकगर्क विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली, २०२४
७७* (२५) - जॉश इंग्लिस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई, २०२६
७४*(२५) - ॲडम गिलख्रिस्ट विरुद्ध दिल्ली , सेंच्युरीयन, २००९
७१*(२३) - प्रभसिमरन सिंग विरुद्ध पंजाब किंग्स, दिल्ली, २०२६
शतक थोडक्यात हुकलं, पण...
जॉश इंग्लिसने ३३ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या १५ धावांनी हुकले. जेमी ओवर्टन याने त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. पण त्याआधी त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील जलद अर्धशतकासह IPL कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करताना पॉवर प्लेमध्ये कमी चेंडूत सर्वाधिक धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत एन्ट्री मारली आहे.