Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:52 IST2026-05-10T16:52:05+5:302026-05-10T16:52:54+5:30

Tamil Nadu CM Thalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे

Tamil Nadu CM Thalapathy Vijay helping remove table video viral after oath ceremony | Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं

Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते मंचावर उपस्थित असलेल्या लोकांसोबत मिळून चक्क एक टेबल उचलताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच समोर आलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सोशल मीडिया युजर्सना विजय यांचा हाच साधेपणा भावला असून त्यांनी लोकांची मन जिंकली आहेत. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं आहे. शपथविधी सोहळा संपल्यानंतर विजय मंचावरील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि स्वतः टेबल उचलून बाजूला ठेवू लागले. कोणत्याही औपचारिकतेची वाट न पाहता त्यांनी दाखवलेली ही सहजता लोकांना प्रचंड आवडली आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच X (ट्विटर), इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. समर्थकांनी विजय यांची तुलना इतर नेत्यांशी करत म्हटलं की, "मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्यात अहंकार नाही, तर विनम्रता दिसते." सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांचं हे वागणं त्यांना सामान्यांच्या अधिक जवळ नेणारं आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. नेटकरी या कृतीवर फिदा झाले आहेत.

मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

" मीच जबाबदार असेन"

विजय यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंचावरून जनतेला संबोधित केलं. आपल्या भाषणात विजय यांनी स्वतःला 'जनतेचाच एक भाग' असल्याचं सांगत पारदर्शक शासनाचं आश्वासन दिलं. "माझ्या सरकारमध्ये कोणतेही पॉवर सेंटर नसेल आणि प्रशासनासाठी केवळ मीच जबाबदार असेन" असं त्यांनी स्पष्ट केलं.

महिला सुरक्षा ते ड्रग्ज कंट्रोल

आपल्या भाषणात विजय यांनी महिला सुरक्षा, अमली पदार्थांवर नियंत्रण आणि पायाभूत सुविधांचा विकास याला प्राधान्य देण्यावर अधिक भर दिला. त्यांचं सरकार पूर्ण पारदर्शकतेने काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाषणानंतर विजय यांनी मंचावरील नेते आणि समर्थकांसोबत सेल्फी देखील काढला, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title : शपथ के बाद तमिलनाडु के मुख्यमंत्री विजय की सादगी ने जीता दिल।

Web Summary : तमिलनाडु के मुख्यमंत्री विजय ने शपथ समारोह के बाद टेबल उठाने में मदद की, जो उनकी विनम्रता को दर्शाता है। लोगों को उनका यह अंदाज़ पसंद आया। विजय ने पारदर्शी शासन का वादा किया, जिसमें महिलाओं की सुरक्षा और नशीली दवाओं पर नियंत्रण प्राथमिकता होगी।

Web Title : Tamil Nadu CM Vijay's simplicity wins hearts after taking oath.

Web Summary : Tamil Nadu's CM Vijay, after his oath ceremony, helped lift a table, showcasing humility. This act resonated with people, who praised his down-to-earth nature. Vijay pledged transparent governance, prioritizing women's safety and drug control.