Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस

Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस

कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:32 IST2026-05-10T17:31:21+5:302026-05-10T17:32:45+5:30

कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

husband shaves head with wife during cancer treatment viral video | Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस

Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस

कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. केमोथेरपीमुळे जेव्हा या महिलेचे केस वेगाने गळू लागले, तेव्हा तिने नाईलाजाने आपले सर्व केस कापण्याचा मोठा निर्णय घेतला. पण त्यानंतर जे घडलं, त्याने इंटरनेटवरील सर्वांची मनं जिंकली. पत्नीचं हे दुःख हलकं करण्यासाठी पतीनेही काहीही न बोलता स्वत:चे केस कापले आहेत.

इन्स्टाग्रामवर नम्रता नितीन गोयल यांनी हा व्हायरल व्हिडीओ  शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नम्रता एका खुर्चीवर बसलेली दिसते आणि तिचे पती अतिशय प्रेमाने तिचे केस काढण्यास मदत करत आहेत. वातावरण अतिशय शांत असतं, परंतु काही सेकंदांनंतर पती स्वतः ट्रिमर घेतात आणि स्वतःचे केस कापतात. हाच क्षण लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेला आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.


व्हिडिओसोबत नम्रताने लिहिलं आहे की, "तू फक्त तुझे केस कापले नाहीस, तर माझं दुःखही स्वतःच्या खांद्यावर घेतलंस." या एका ओळीने हजारो लोकांना भावूक केलं आहे. अनेक युजर्सनी म्हटलं आहे की, खरं प्रेम मोठ्या शब्दांत नाही, तर अशा छोट्या पण खोलवर साथ देणाऱ्या कृतीतून दिसून येतं. तू एकटी नाहीस... हेच पतीने दाखवून दिलं आहे. 

नम्रताने आपल्या जुन्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की, केमोथेरपीनंतर केस गळणं हा तिच्यासाठी सर्वात कठीण अनुभवांपैकी एक अनुभव होता. दुसऱ्या सेशननंतर केस इतक्या वेगाने गळू लागले होते की, डोक्याला स्पर्श केला तरी वेदना होत होत्या. उपचारादरम्यान असं घडणार आहे हे तिला आधीच माहित होतं, तरीही प्रत्यक्षात त्या क्षणाला सामोरे जाणं अत्यंत भावनिक होतं.

व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. कोणी याला 'नात्याची खरी ताकद' म्हटलं आहे, तर कोणी लिहिलं की 'प्रत्येक महिलेला असा जोडीदार मिळावा'. आजारपणाच्या काळात सर्वात मोठं औषध केवळ उपचार नसून आपल्या माणसांची साथ असते, असंही अनेक युजर्सनी म्हटलं आहे.

Web Title : कैंसर से जूझ रही पत्नी के लिए पति ने मुंडवाया सिर: सच्चा प्यार!

Web Summary : कीमोथेरेपी करा रही पत्नी के साथ एकजुटता दिखाने के लिए पति द्वारा अपना सिर मुंडवाने का एक वीडियो वायरल हो गया है। पत्नी, नम्रता नितिन गोयल ने इस भावनात्मक पल को साझा किया, जिसमें उनके पति ने मुश्किल समय में उनका साथ दिया। यूजर्स इस बंधन से भावुक हैं।

Web Title : Husband shaves head for wife battling cancer: True love!

Web Summary : A video of a husband shaving his head in solidarity with his wife undergoing chemotherapy has gone viral. The wife, नम्रता नितीन गोयल, shared the emotional moment, highlighting the husband's supportive gesture during her difficult time. Users are touched by their bond.