हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:24 IST2026-05-10T16:22:56+5:302026-05-10T16:24:12+5:30

हंटाव्हायरसच्या विळख्यात अडकलेलं 'MV होंडियस' हे लक्झरी क्रूझ जहाज स्पेनच्या टेनेरिफ बेटावर पोहोचलं आहे. ८ जण बाधित असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Hantavirus-infected ship finally reaches Spain! 3 dead; WHO launches 'special operation' to rescue passengers | हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'

हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरलेलं आणि 'हंटाव्हायरस'ने बाधित झालेलं 'MV होंडियस' हे लक्झरी क्रूझ जहाज रविवारी सकाळी स्पेनच्या टेनेरिफ बेटावर पोहोचलं आहे. या जहाजावर हंताव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने आतापर्यंत ८ जण आजारी पडले असून, त्यापैकी ३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका डच दाम्पत्यासह एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. या गंभीर परिस्थितीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने स्पेनकडे मदतीचा हात मागितला होता.

ग्रेनाडिला बंदरावर प्रवाशांची सुटका सुरू

हे जहाज टेनेरिफमधील ग्रेनाडिला बंदराजवळ थांबवण्यात आलं आहे. जहाजावर २३ वेगवेगळ्या देशांतील एकूण १४९ प्रवासी आणि क्रू मेंबर्स आहेत. जरी सध्या इतर प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसली, तरी युरोपियन हेल्थ एजन्सीने सर्व प्रवाशांना 'हाय-रिस्क कॉन्टॅक्ट' मानलं आहे. या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी स्पेन सरकार आणि WHO कडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

असं असेल रेस्क्यू ऑपरेशन

लहान बोटींचा वापर: प्रवाशांना मोठ्या जहाजातून किनाऱ्यावर आणण्यासाठी छोट्या बोटींचा वापर केला जाईल.

आरोग्य तपासणी: किनाऱ्यावर पोहोचताच प्रत्येक प्रवाशाची सखोल वैद्यकीय चाचणी केली जाईल.

सुरक्षित रवानगी: चाचणीनंतर प्रवाशांना बंद बसमधून थेट टेनेरिफ विमानतळावर नेलं जाईल, तिथून ते आपापल्या देशांत रवाना होतील.

स्पॅनिश नागरिकांना प्राधान्य: सर्वात आधी स्पेनच्या नागरिकांना उतरवलं जाईल, त्यानंतर इतर देशांच्या प्रवाशांची सुटका होईल.

WHO प्रमुखांची धाव

या ऑपरेशनचं गांभीर्य पाहून WHOचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस स्वतः शनिवारी संध्याकाळी टेनेरिफमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत स्पेनचे आरोग्य आणि गृहमंत्री देखील या रेस्क्यू ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आफ्रिकेतील केप वर्डे या देशाने प्रवाशांना उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर स्पेनने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

काय आहे हंटाव्हायरस?

हंटाव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेतून पसरतो. यामुळे श्वसनाचा गंभीर त्रास होऊ शकतो. सुदैवाने, हा व्हायरस माणसाकडून माणसाकडे पसरण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर मोठा धोका नसल्याचं WHOने स्पष्ट केलं आहे. हे जहाज प्रवाशांच्या सुटकेनंतर नेदरलँड्सला नेलं जाणार असून, तिथे संपूर्ण जहाजाचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

Web Title : हंतावायरस से ग्रस्त जहाज स्पेन पहुंचा; तीन की मौत, WHO का विशेष अभियान।

Web Summary : हंतावायरस से ग्रस्त जहाज 'एमवी होंडियस' स्पेन पहुंचा। आठ संक्रमितों में से तीन की मौत हो गई। 23 देशों के 149 यात्रियों की जांच हो रही है। WHO और स्पेन बचाव अभियान चला रहे हैं, जिसमें स्पेनिश नागरिकों को प्राथमिकता दी जा रही है। जहाज को नीदरलैंड में साफ किया जाएगा।

Web Title : Hantavirus-hit ship reaches Spain; three dead, WHO special operation.

Web Summary : Hantavirus-stricken ship 'MV Hondius' reached Spain. Three died among eight infected. 149 passengers from 23 countries are undergoing checkups. WHO and Spain are conducting a rescue operation, prioritizing Spanish citizens. The ship will be sanitized in the Netherlands.