IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?

१८० पेक्षा अधिक धावा अन् CSK साठी धोक्याची घंटा

By सुशांत जाधव | Updated: May 10, 2026 18:11 IST2026-05-10T18:11:06+5:302026-05-10T18:11:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs LSG When was the last time Chennai Super Kings chased a 180-plus target | IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?

IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?

जगातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयपीएल स्पर्धेतील १९ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दमदार कमबॅक करत प्लेऑफ्सच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रविवारी १० मे रोजी चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

LSG च्या संघाने CSK समोर सेट केले आव्हानात्मक टार्गेट

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जॉश इंग्लिशच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर लखनौच्या संघाने दमदार सुरुवात केली. अखेरच्या षटकात शाहबाज अहमदने केलेल्या २५ चेंडूतील नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद २०३ धावा करत चेन्नई सुपर किंग्ससमोर २०४ धावांचे तगडे आव्हान ठेवले. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असला तरी १८० धावांचा पाठलाग करताना  ते अडखळताना दिसले आहेत. इथं जाणून घेऊयात कसा आहे त्याचा IPL मध्ये १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करतानाचा रेकॉर्ड

CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव

१८० पेक्षा अधिक धावा अन् CSK साठी धोक्याची घंटा

याआधी २०१८ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पुण्याच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १८० धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले होते. एक षटक राखून चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने विजय नोंदवला होता. पण त्यानंतर १८० पेक्षा अधिक धावा म्हणजे CSK साठी पराभवाची घंटा असेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे.  

 
IPL इतिहासात CSK चा सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड

  • २०१२ – RCB विरुद्ध चेन्नईत २०६ धावांचं लक्ष्य
  • २०१८ – RCB विरुद्ध बेंगळुरूत २०६ धावांचं लक्ष्य
  • २०१८ – KKR विरुद्ध चेन्नईत २०३ धावांचं लक्ष्य
  • २०१० – पंजाब विरुद्ध धर्मशालामध्ये १९३ धावांचं लक्ष्य
  • २०१० – दिल्ली विरुद्ध दिल्लीत १८६ धावांचं लक्ष्य

Web Title : आईपीएल 2026: 180+ रनों का पीछा करते हुए कैसा है सीएसके का रिकॉर्ड?

Web Summary : सीएसके के लिए बड़े स्कोर का पीछा करना एक चुनौती है। हालांकि उन्होंने पहले भी 180+ रनों का सफलतापूर्वक पीछा किया है, खासकर 2018 में, लेकिन अक्सर यह एक संघर्ष रहा है। लखनऊ का 203 का लक्ष्य चेन्नई के लिए एक महत्वपूर्ण बाधा है।

Web Title : IPL 2026: How CSK fares chasing 180+ scores?

Web Summary : CSK faces a challenge chasing high scores. While they've successfully chased 180+ before, particularly in 2018, it's often been a struggle. Lucknow's formidable 203 target presents a significant hurdle for Chennai.