"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 19:08 IST2026-05-10T18:38:00+5:302026-05-10T19:08:33+5:30

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी थेट भूमिका मांडली आहे.

"Discussion is not surrender!" Iranian President's direct warning to America; Mojtaba Khamenei also in action mode! | "चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!

"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!

पश्चिम आशियातील युद्धाचे ढग अधिक गडद होत असताना इराणने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. "अमेरिकेसोबत चर्चा करणे याचा अर्थ आम्ही गुडघे टेकले आहेत असा होत नाही," अशा कडक शब्दांत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला सुनावले आहे. एकीकडे मुत्सद्देगिरीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी लष्करी कमांडर्सची भेट घेऊन रणशिंग फुंकल्याने जगाची धाकधूक वाढली आहे.

देशहिताशी तडजोड नाही: पेझेश्कियान

इराणमध्ये झालेल्या युद्धजन्य नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पेझेश्कियान बोलत होते. ते म्हणाले की, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण ही आमची कमकुवतपणाची निशाणी नाही. इराणच्या जनतेचे अधिकार आणि देशाचे हित जपण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. चर्चा करण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट हे आपल्या अधिकारांचे रक्षण करणे हेच आहे."

गुढ शांततेनंतर मोज्तबा खामेनी समोर!

गेल्या काही दिवसांपासून इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत आणि ठावठिकाण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, खतम अल-अनबिया संयुक्त लष्करी कमांडचे प्रमुख अली अब्दोल्लाही यांनी मोज्तबा यांची भेट घेतल्याचे वृत्त सरकारी मीडियाने दिले आहे. या भेटीत मोज्तबा यांनी लष्कर, रिव्होल्यूशनरी गार्ड्स, पोलीस आणि बसीज फोर्सच्या सज्जतेचा आढावा घेतला. शत्रूचा सामना करण्यासाठी त्यांनी लष्कराला नवीन आणि कडक सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे इराण आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

शांततेसाठी 'पाकिस्तान-कतार'ची शिष्टाई

युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन अल-थानी यांच्यात या विषयावर फोनवरून सविस्तर चर्चा झाली. या दोन्ही देशांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे, कतारच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ यांचीही भेट घेऊन इराण युद्धावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

काय होणार पुढे?

इराणने एकीकडे चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले असले, तरी लष्करी सज्जतेत कोणतीही कसर सोडलेली नाही. पाकिस्तान आणि कतारची मध्यस्थी यशस्वी होणार की इराण आणि अमेरिकेतील हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान की अमेरिका को चेतावनी: बातचीत आत्मसमर्पण नहीं; खमेनी का सैन्य कार्रवाई का आदेश

Web Summary : ईरान ने अमेरिका को चेतावनी दी है कि बातचीत का मतलब आत्मसमर्पण नहीं है। राष्ट्रपति रईसी ने राष्ट्रीय हितों की रक्षा पर जोर दिया। मुजतबा खमेनी ने सैन्य तैयारियों की समीक्षा की और सख्त आदेश जारी किए, जबकि पाकिस्तान और कतर संघर्ष को कम करने के लिए मध्यस्थता का प्रयास कर रहे हैं।

Web Title : Iran Warns US: Talks Aren't Surrender; Khamenei Orders Military Action

Web Summary : Iran asserts talks with the US don't imply surrender amidst rising Mideast tensions. President Raisi emphasizes defending national interests. Mojtaba Khamenei reviewed military readiness and issued strict orders, while Pakistan and Qatar attempt mediation to de-escalate the conflict.