धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:35 IST2026-05-10T18:31:19+5:302026-05-10T18:35:39+5:30

ही धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे घडली आहे. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी जखमी पतीची पत्नी व प्रियकरास अटक केली.

Shocking Obstacle in immoral relationship, attempt to murder husband by giving him a shock; Wife and lover arrested | धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक

धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक


अकोला बाजार (यवतमाळ) : अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या सांगण्यावरून पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे घडली आहे. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी जखमी पतीची पत्नी व प्रियकरास अटक केली.

जमखी गजानन वसंता मोरे (३८) रा. पंगडी ता. कळंब यांनी दिलेल्या तक्रारीतुन त्यांची पत्नी कवडी गजानन मोरे (३५) आणि तिचा प्रियकर विष्णु कडू आत्राम (४५) याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने आरोपींनी कट रचल्याचे तक्रारीत नमूद आहे. ३ मे रोजी रात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास गजानन मोरे हे घरी झोपलेले असताना पत्नीने विद्युत वायरला अॅल्युमिनियम तार बांधून त्याला विजेचा शॉक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत गजाननच्या दोन्ही हाताचे दंडाला विजेचा शॉक लागला. या प्रकरणी ८ मे रोजी रात्री वडगाव जंगल पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी रविवारी प्रियकर विष्णु आत्राम व फिर्यादीची पत्नी कवडी मोरे हिला अटक केली आहे.

या गुन्ह्याचा तपास पाेलिस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, ठाणेदार विकास दांडे यांनी भेट दिली. घटनास्थळावरून या कटामध्ये वापरलेली विद्युत वायर व अल्युमिनियम तार पोलिसांनी जप्त केली. घरात विजेचा अवैधरित्या पुरवठा जोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title : अनैतिक संबंध: पत्नी और प्रेमी ने पति को बिजली का झटका देकर मारने का प्रयास, गिरफ्तार

Web Summary : यवतमाल में, एक पत्नी और उसके प्रेमी को पति को बिजली का झटका देकर मारने की कोशिश के आरोप में गिरफ्तार किया गया। पत्नी का प्रेम संबंध था और उसने पति को रास्ते से हटाने के लिए प्रेमी के साथ साजिश रची।

Web Title : Wife and lover arrested for shocking husband in adultery case.

Web Summary : In Yavatmal, a wife and her lover were arrested for attempting to kill the husband with an electric shock. The wife, involved in an affair, plotted with her lover to eliminate her husband, who was seen as an obstacle.