"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन

विक्रमी अर्धशतकी खेळीनंतर उर्विल पटेलचं खास सेलिब्रेशन

By सुशांत जाधव | Updated: May 10, 2026 19:23 IST2026-05-10T19:19:46+5:302026-05-10T19:23:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
For You Papa Urvil Patel Honours Father with Heartfelt Message After Record Breaking 13 Ball Fifty During CSK vs LSG IPL 2026 Watch Video | "बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन

"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन

IPL 2026 CSK vs LSG Urvil Patel Shared Emotional Note For Father : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५३ व्या सामन्यात उर्विल पटेलन स्फोटक फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत IPL च्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला. या विक्रमी खेळीनंतर उर्विलने आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीवर "बाबा, ही खास खेळी तुमच्यासाठी..." असा भावनिक संदेश लिहिला होता. 

लखनौविरुद्धच्या सामन्यात उर्विल पटेल  २३ चेंडूंमध्ये ६५ धावा करून बाद झाला. आपल्या या धडाकेबाज खेळीत त्याने ८ षटकार आणि २ चौकार लगावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज यावरूनच येतो की, पहिल्या ६ चेंडूंमध्येच त्याने ५ षटकार ठोकले होते. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. पण १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना बऱ्याचदा ते अपयशी ठरले आहेत. पण यावेळी उर्विल पटेलनं विक्रमी खेळीसह CSK ची ही डोकेदुखी कमी करणारी शानदार खेळी केली.

Web Title : उर्विल पटेल का रिकॉर्ड अर्धशतक: खेल के बाद पिता को भावुक समर्पण

Web Summary : उर्विल पटेल ने आईपीएल 2026 में सीएसके के लिए एलएसजी के खिलाफ 13 गेंदों में रिकॉर्ड-बराबर अर्धशतक बनाया, अपनी विस्फोटक पारी को अपने पिता को एक हार्दिक संदेश के साथ समर्पित किया। 23 गेंदों में 65 रनों की उनकी पारी में 8 छक्के शामिल थे।

Web Title : Urvil Patel's Record Fifty: Emotional Dedication to Father After the Game

Web Summary : Urvil Patel smashed a record-equaling fifty in 13 balls for CSK against LSG in IPL 2026, dedicating his explosive innings to his father with a heartfelt message. His knock of 65 off 23 balls included 8 sixes.