Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला

Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला

Hanta Virus : WHO प्रमुखांनी टेनेरिफच्या रहिवाशांना खास मेसेज दिला आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:32 IST2026-05-10T15:30:54+5:302026-05-10T15:32:29+5:30

Hanta Virus : WHO प्रमुखांनी टेनेरिफच्या रहिवाशांना खास मेसेज दिला आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

who head reassure residents spanish island Hanta Virus stricken ship | Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला

Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला

स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील टेनेरिफ बेटावर एका चिंताजनक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी टेनेरिफमधील रहिवाशांना आश्वासन दिलं आहे की, हंटा व्हायरसने बाधित 'एमव्ही होंडियस' (MV Hondius) ही लक्झरी क्रूझ आल्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही.

परिस्थिती नियंत्रणात 

WHO प्रमुखांनी टेनेरिफच्या रहिवाशांना खास मेसेज दिला आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. क्रूझद्वारे पर्यटन होणं ही सामान्य बाब आहे, परंतु अशा घटना दुर्मिळ आहेत. हे द्वीप पर्यटनावर अवलंबून असल्याने स्थानिक लोकांमध्ये चिंता असणं स्वाभाविक आहे. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी बंदर परिसर सील केला असून कोणताही अनावश्यक संपर्क टाळला जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण अशा परिस्थितीत सतर्क राहण्याचा, काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

तपास आणि खबरदारी

गेल्या काही वर्षांत, विशेषतः कोरोना काळात क्रूझवर व्हायरस पसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, हंटा व्हायरसचं प्रकरण वेगळं आहे कारण याचा संबंध प्राण्यांशी असतो. जहाजावर उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या माध्यमातून हा व्हायरस पोहोचला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असून त्या दिशेने तपास सुरू आहे. क्रूझचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलं जाईल. 

ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंटा व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं

WHO ने दिला मोलाचा सल्ला

स्पेन सरकार आणि युरोपियन आरोग्य संस्था एकत्रितपणे ही परिस्थिती हाताळत आहेत. प्रवाशांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात असून, कोणतीही नवीन लक्षणं आढळल्यास तत्काळ उपचार सुरू केले जातील. टेनेरिफमधील ही घटना सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून अधिकाऱ्यांच्या मते धोका टळला आहे.

सध्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जात असून स्थानिक लोकांसाठी कोणताही धोका नाही. WHO आणि स्पॅनिश आरोग्य विभाग सतत यावर लक्ष ठेवून आहेत. सामान्य नागरिकांना हात स्वच्छ धुणं, स्वच्छता पाळणं आणि अनावश्यक गर्दी टाळणे यांसारख्या साध्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हंटा व्हायरस म्हणजे काय?

हंटा व्हायरस हा एक गंभीर व्हायरस असून तो प्रामुख्याने उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. हा आजार फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये तो जीवघेणाही ठरू शकतो. या क्रूझवर हा व्हायरस कसा पसरला, याचा तपास सध्या सुरू आहे.

लक्षणं आणि प्रसार

सामान्यतः हा व्हायरस हवेतून किंवा थेट संपर्कातून पसरतो. याच्या लक्षणांमध्ये खूप ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं आणि खोकला यांचा समावेश असू शकतो. सुरुवातीची लक्षणं सामान्य फ्लू (ताप) सारखीच असल्याने, याची ओळख पटणं कठीण होतं. माणसाकडून माणसाकडे होणारा प्रसार अत्यंत दुर्मिळ असला तरी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

Web Title : हंटा वायरस से घबराने की जरूरत नहीं, स्थिति नियंत्रण में: WHO

Web Summary : WHO ने टेनेरिफ के निवासियों को आश्वासन दिया कि क्रूज जहाज पर हंटा वायरस के कारण घबराने की कोई जरूरत नहीं है। स्थिति नियंत्रण में है और सावधानियां बरती जा रही हैं। संभावित पशु-जनित संचरण के संबंध में जांच चल रही है। जनता को स्वच्छता बनाए रखने और भीड़ से बचने की सलाह दी गई है।

Web Title : No need to panic about Hanta virus, situation controlled: WHO

Web Summary : WHO assures Tenerife residents there's no need to panic due to Hanta virus on a cruise ship. The situation is under control with precautions taken. Investigations are underway regarding potential animal-borne transmission. Public advised to maintain hygiene and avoid crowds.