शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री विजय यांच्या आईसोबत दिसली तृषा कृष्णन; भेटताच मारली मिठी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:46 IST2026-05-10T15:24:35+5:302026-05-10T15:46:36+5:30
थलापती विजय यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार; अभिनेत्री त्रिशा कृष्णनने वेधले लक्ष!

शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री विजय यांच्या आईसोबत दिसली तृषा कृष्णन; भेटताच मारली मिठी!
Thalapathy Vijay CM Oath : तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णन हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
निळ्या रंगाच्या सुंदर साडीत तृषा कृष्णन समारंभाला उपस्थित राहिली होती. कार्यक्रमादरम्यान तिने विजय यांच्या आईशोभा चंद्रशेखर यांची भेट घेत त्यांना प्रेमाने मिठी मारली. दोघींच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तृषा कृष्णनसोबत तिची आई उमा कृष्णनदेखील उपस्थित होत्या.
VIDEO | Chennai: Actor Trisha Krishnan warmly greets TVK chief Vijay's sister and mother as she arrives at Jawaharlal Nehru Indoor Stadium for his swearing-in as Tamil Nadu CM.
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/tePCyk9uHa
तृषा कृष्णन व जोसेफ विजय हे एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरू आहेत. अभिनेत्याच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करताना त्याचे लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. परंतु, दोघांनीही अद्याप याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयचे अभिनेत्री तृषा कृष्णनबरोबर अफेअर असल्याचे अनेक महिन्यांपासून म्हटले जाते आहे.