Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग

Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग

Loan Rates Hike: सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँकेनं आपल्या 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट'मध्ये बदल केला आहे. बँकेनं या दरात ५ बेसिस पॉईंट्सची म्हणजेच ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन दर १२ मे २०२६ पासून लागू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:41 IST2026-05-13T13:41:29+5:302026-05-13T13:41:29+5:30

Loan Rates Hike: सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँकेनं आपल्या 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट'मध्ये बदल केला आहे. बँकेनं या दरात ५ बेसिस पॉईंट्सची म्हणजेच ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन दर १२ मे २०२६ पासून लागू झाले आहेत.

Loan Rates Hike canara bank government bank has increased interest rates now EMIs of Home Loan and Car Loan may become expensive | Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग

Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग

Loan Rates Hike: जर तुम्ही कॅनरा बँकेचे ग्राहक असाल आणि तुमचे गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्ज या बँकेतून सुरू असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कॅनरा बँकेनं आपल्या 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट'मध्ये (MCLR) बदल केला आहे. बँकेनं या दरात ५ बेसिस पॉईंट्सची म्हणजेच ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन दर १२ मे २०२६ पासून लागू झाले आहेत.

बँकेचे सुधारित MCLR दर पुढीलप्रमाणे

बँकेने सर्व कालावधीच्या कर्जांसाठी ५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

ओव्हरनाईट: ७.९० टक्के (पूर्वी ७.८५ टक्के)
१ महिना: ७.९५ टक्के (पूर्वी ७.९० टक्के)
३ महिने: ८.२० टक्के (पूर्वी ८.१५ टक्के)
६ महिने: ८.५५ टक्के (पूर्वी ८.५० टक्के)
१ वर्ष: ८.७५ टक्के (पूर्वी ८.७० टक्के)
२ वर्षे: ९ टक्के (पूर्वी ८.९५ टक्के)
३ वर्षे: ९.०५ टक्के (पूर्वी ९ टक्के)

पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल?

बँकेचा '१ वर्षाचा MCLR' दर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण बहुतांश गृह, कार आणि वैयक्तिक कर्जाचे दर याच दराशी जोडलेले असतात. आता हा दर ८.७० टक्क्यांवरून ८.७५ टक्के झाला आहे. ज्या ग्राहकांचं कर्ज फ्लोटिंग रेटवर आधारित आहे आणि MCLR शी जोडलेले आहे, त्यांच्या कर्जाचा व्याजदर वाढल्यामुळे मासिक हप्ता म्हणजेच EMI वाढण्याची शक्यता आहे.

MCLR म्हणजे काय?

MCLR हा तो किमान व्याजदर असतो ज्यापेक्षा कमी दराने बँक सामान्य परिस्थितीत कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. जेव्हा बँक MCLR दरात वाढ करते, तेव्हा त्याशी संबंधित सर्व कर्जे महाग होतात. याउलट, जेव्हा बँक हे दर कमी करते, तेव्हा ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होते. केनरा बँकेच्या या निर्णयामुळे आता कर्जदारांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.

Web Title : केनरा बैंक ने बढ़ाईं लोन दरें; होम, कार लोन की ईएमआई बढ़ सकती है।

Web Summary : केनरा बैंक ने 12 मई, 2026 से प्रभावी, एमसीएलआर में 5 बेसिस प्वाइंट की वृद्धि की। इससे फ्लोटिंग रेट से जुड़े होम, कार और पर्सनल लोन की ईएमआई बढ़ने की संभावना है। एक साल का एमसीएलआर, अब 8.75% पर, कई ऋणों के लिए महत्वपूर्ण है, जो उधारकर्ताओं की वित्तीय स्थिति को प्रभावित कर सकता है।

Web Title : Canara Bank Hikes Loan Rates; EMI for Home, Car Loans May Rise.

Web Summary : Canara Bank increased its MCLR by 5 basis points, effective May 12, 2026. This will likely increase EMIs for home, car, and personal loans tied to the floating rate. The one-year MCLR, now at 8.75%, is crucial for many loans, potentially impacting borrowers' finances.