Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Jewellery Stocks Crash: पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

Jewellery Stocks Crash: पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

Jewellery Stocks Crash: केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानं ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. ज्वेलरी शेअर्सच्या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:21 IST2026-05-13T12:20:05+5:302026-05-13T12:21:19+5:30

Jewellery Stocks Crash: केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानं ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. ज्वेलरी शेअर्सच्या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत आहे.

Jewellery Stocks Crash kalyan senco titan png First the Pm modi appeal now an increase in import duty Jewellery stocks crash down by up to 20 percent | Jewellery Stocks Crash: पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

Jewellery Stocks Crash: पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

Jewellery Stocks Crash: केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानं ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे देशात सोन्या-चांदीची मागणी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात असून, बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत कोसळले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संकट पाहता नागरिकांना एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं, ज्याचा परिणाम सोमवार आणि मंगळवारच्या सत्रातही दिसून आला होता. गेल्या तीन दिवसांत या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.

कल्याण ज्वेलर्सला सर्वाधिक फटका

या घसरणीचा सर्वाधिक फटका कल्याण ज्वेलर्सला बसला असून कंपनीचा शेअर सुमारे ६ टक्क्यांनी घसरून ३४०.१० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. मंगळवारी ३६१.९५ रुपयांवर बंद झालेला हा शेअर आज ३४६.२५ रुपयांवर उघडला. गेल्या तीन दिवसांत या शेअरमध्ये २० टक्क्यांची घट झाली असून, आपल्या उच्चांकी पातळीवरून (६१७.३० रुपये) हा शेअर आता ४५ टक्क्यांनी खाली आलाय.

४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले

टाटा समूहाच्या टायटनमध्येही घसरण

टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाइटनच्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसांत सुमारे १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील सत्रात ४,०५४.०५ रुपयांवर बंद झालेला टायटनचा शेअर आज ४,०४३.९५ रुपयांवर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो ३,९८७.५५ रुपयांपर्यंत खाली आला. सध्या हा शेअर सुमारे ४०२४.८५ रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४,६०१.१० रुपये तर नीचांकी पातळी ३,३०१.०५ रुपये आहे.

इतर ज्वेलरी शेअर्सची स्थिती

  • सेनको गोल्ड: या शेअरमध्ये आज १.६ टक्के तर गेल्या तीन दिवसांत १८ टक्के घसरण झाली आहे. आज या शेअरनं ३१५.२५ रुपयांचा उच्चांक आणि २९९.२० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला.
  • थंगमयिल ज्वेलरी: या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ६ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
  • पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स: या शेअरमध्ये देखील १ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली.
     

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : आयात शुल्क बढ़ने और पीएम की अपील से ज्वेलरी स्टॉक में गिरावट

Web Summary : आयात शुल्क 15% तक बढ़ने से ज्वेलरी स्टॉक में भारी गिरावट आई। कल्याण ज्वेलर्स के शेयरों में बड़ी गिरावट। टाटा के टाइटन में भी गिरावट दर्ज की गई। अन्य ज्वेलरी कंपनियों के शेयरों में भी गिरावट आई।

Web Title : Jewellery Stocks Plunge Amid Duty Hike, PM's Appeal; Tata Shares Fall

Web Summary : Jewellery stocks crashed as import duty rose to 15%. Kalyan Jewellers fell sharply. Tata's Titan also saw significant decline. Other jewellery companies followed suit.