Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:46 IST2026-05-13T13:45:37+5:302026-05-13T13:46:55+5:30

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या चौघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai: Diseases cured by placing hands on head; Four arrested for spreading superstition; Accused of opposing worship of idols and images of God in homes | Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप

Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप

मुंबई : तुमच्या देवाची पूजा करूनही आजार बरा होत नाही, आमच्या येशूची प्रार्थना करून पाहा, असे सांगून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या चौघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. घरात देवाच्या मूर्ती व फोटो ठेवू नका, असेही सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सांताक्रूझ पूर्व येथे राहणाऱ्या आशा उपाध्याय (४५) यांनी याबाबत मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उपाध्याय या गृहिणी असून, त्यांना गेल्या सात वर्षांपासून थायरॉइड आणि रक्तदाबाचा त्रास आहे. उषा गुप्ता ही महिला तिच्यासोबत तीन अनोळखी महिलांना घेऊन ८ मे रोजी दुपारी उपाध्याय यांच्या घरी आली. संबंधित महिलांनी येशूच्या प्रार्थनेने सर्व आजार बरे होतात, असे सांगितले. 

दर रविवारी प्रार्थनासभेला येण्याचे द्यायचे आमंत्रण तसेच मालाड पश्चिम येथील शाळेत दर रविवारी प्रार्थनासभा होत असल्याचे सांगून त्यांना कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.

आजार बरे करण्याच्या दाव्याबाबत संशय आल्याने उपाध्याय यांनी ही बाब आपल्या मुलगा आदित्य याला सांगितली. त्यानंतर १० मे रोजी आदित्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी मालाड येथील एका खासगी शाळेत रमेश गुप्ता हा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे करत असल्याचे भासवत होता. 

अघोरी प्रथा,जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा 

यानंतर आदित्यने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यावरून मालाड पोलिसांनी रमेश गुप्ता, उषा गुप्ता, अमन दुबे, मुकेश यादव आणि तीन अनोळखी महिलांविरोधात अंधश्रद्धा पसरविणे, फसवणूक आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धा पसरविल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी चौघांविरोधात ११ मे रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तसेच चमत्काराचा प्रचार करून उपस्थितांमध्ये अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उषा गुप्ता, अमन दुबे आणि मुकेश यादव हे रमेशला मदत करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आदित्यने या प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्याला मज्जाव केला.

Web Title : मुंबई: अंधविश्वास फैलाने, बीमारी ठीक करने का दावा करने वाले चार गिरफ्तार

Web Summary : मुंबई पुलिस ने प्रार्थना से बीमारियों को ठीक करने और अन्य देवताओं की पूजा को हतोत्साहित करने का दावा करने वाले चार लोगों को गिरफ्तार किया। उन पर कथित तौर पर आस्था के नाम पर इलाज को बढ़ावा देने, लोगों को अपनी मान्यताएं छोड़ने के लिए उकसाने, धोखाधड़ी और धार्मिक भावनाओं को आहत करने का आरोप है।

Web Title : Mumbai: Four Arrested for Faith Healing, Promoting Superstition

Web Summary : Mumbai police arrested four individuals claiming to cure illnesses through prayer and discouraging worship of other deities. They allegedly promoted faith healing, urging people to abandon their own beliefs, leading to charges of fraud and hurting religious sentiments.