देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मेगा भरतीस मोर्चे काढणाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील तरुणांची मोठी नाराजी येण्याच्या भीतीने काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. ...
मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...
काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़ ...
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. अनेक आंदोलनांना हिंसक वळणही लागलंय, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत जवळपास 5 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. ...
दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे. ...