देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. ...
कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल सर्व अनिवासी भारतीय होते, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले आहे. ...