देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोनच दिवसांतच गुजरात काँग्रेसची अधिकृत वेबसाइट हॅक करण्यात आली असून, काँग्रेसने ती लगेचच बंद केली आहे. ...
लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. ...
लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. काँग्रेसला बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा ...
निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशया ...
राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ...