देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. ...
चौकीदार चोर आहे, असे गेल्या सहा महिन्यांपासून ते बोलत आहेत. मात्र नोटांचे बंडल त्यांच्याच नेत्यांच्या घरातच सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच चोर असून त्यांना आता चौकीदाराची भीती वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
औरंगाबादमधून काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी औरंगाबादमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट देखील घेतली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार या चर्चांन ...
काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेलं आहे,' अशी टीका केली आहे. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असून, त्यामध्ये गठ्ठा मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. ...