देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा ...