देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Motilal Vora Passed Away: मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्होरा यांचे आज निधन झाले ...
Rahul Gandhi : राहुल यांच्या भूमिकेने अध्यक्षपदाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता संपेल. मात्र काँग्रेसमध्ये संसदीय मंडळाची स्थापना करावी तसेच कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांवर २३ असंतुष्ट नेते कायम आहेत. ...