कोणत्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करीत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी ‘भगोडा’ पालकमंत्र्यांचा निषेध असो, असे नारे देत नियोजन भवन दणाणून सोडले. ...
मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. चिखलदरा परिसरात दवबिंदू गोठू लागले आहेत. ...
धावत्या रेल्वे गाडीच्या चालकास व सहायकास त्यांच्या कुटुंबांचा अति महत्त्वाचा संदेश तत्काळ मिळावा, असा आदेश मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा यांनी शुक्रवारी (२८ डिसेंबर) बडने-यातील पाहणी दौ-यात दिला. ...
राज्याने दोन हजार मेगावॅटचा ‘सौरऊर्जा प्रकल्प’ हाती घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्याकरिता प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ...
माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे. ...
गोडवाडी येथील प्रतीक्षा भगीरथ पवार या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर रूबेला लसीकरणमुळे मृत्यूचे संकट ओढावले आहे. प्रतीक्षावर सध्या नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. ...
मागील आठवड्यापासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह संपूर्ण मेळघाट थंडीने गारठला आहे. या आठवड्यात सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस, तर कमाल १५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार् ...