...म्हणून हुशार व्यक्ती एकेकट्या राहतात! 'या' १० कारणांमुळे ते हुशारही असतात आणि आनंदीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:19 IST2026-04-27T11:11:43+5:302026-04-27T14:19:20+5:30

Why Highly Intelligent People Prefer Solitude : अनेकदा त्यांना त्यांच्या विचार पातळीशी जुळणारे लोक सहज मिळत नाहीत.

जास्त हूशार किंवा बुद्धीमान लोकांना एकटं राहायला आवडण्यामागे काही महत्वाची मानसशास्त्रीय कारणं असतात. (Why Smart People Stay Alone And Kind Souls)हूशार व्यक्तींना नवीन कल्पनांवर विचार करण्यासाठी आणि स्वत:च्या प्रगतीसाठी शांततेची गरज असते जी त्यांना एकांतात मिळते.

अशी माणसं क्वांटिटिपेक्षा क्वालिटीवर विश्वास ठेवतात. त्यांना निरर्थक गप्पा मारण्यापेक्षा अर्थपूर्ण लोकांशी संवाद साधायला आवडतो.

बुद्धीमान लोक सहसा त्यांच्या ध्येयाप्रती अत्यंत जागरूक असतात. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमात वेळ घालवण्याऐवजी ते आपल्या कामाला प्राधान्य देतात.

एकटं राहिल्यामुळे त्यांना सभोवतालच्या जगाचे आणि लोकांचे अधिक चांगल्या प्रकारे निरिक्षण करता येते.

त्यांना स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. ते स्वत:च्या सहवासात समाधानी असतात.

अनेकदा त्यांना त्यांच्या विचार पातळीशी जुळणारे लोक सहज मिळत नाहीत. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या घोळक्यात राहण्यापेक्षा ते एकटं राहणं पसंत करतात.

सामाजिक दबावापासून दूर राहिल्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळते आणि त्यांची कार्यक्षमता वाढते.

अनेकदा त्यांचे विचार समाजाच्या रूढ चौकटीबाहेरचे असतात. त्यामुळे वादावादी टाळण्यासाठी हे लोक एकटे राहतात.

हूशार लोक स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतात. आत्मपरिक्षण करण्यासाठी आणि स्वत:च्या भावना समजून घेण्यासाठी त्यांना एकांत हवा असतो.