उन्हाळ्यात बीपी अचानक लो झाले तर चटकन करा ७ गोष्टी, चक्कर येणं-अंधेरी येणंही टळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:49 IST2026-05-11T13:17:52+5:302026-05-11T13:49:47+5:30
What To Do If BP Goes Low : जर अशक्तपणामुळे बी. पी लो झाला असेल तर डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा खा किंवा मीठ लावलेले पदार्थ खाल्ल्यानंही फायदा होतो.

अचानक रक्तदाब कमी झाल्यावर (Low BP) घाबरून न जाता तातडीनं काही पाऊलं उचलणं महत्वाचं आहे. (What To Do When BP Is Low Immediately)

BP लो झाल्यावर व्यक्तीनं त्वरीत जमिनीवर किंवा बेडवर झोपावे. झोपल्यानंतर पायंच्या खाली 2 ते 3 उशा ठेवून पाय हृदयाच्या पाळीपेक्षा उंच करावेत. (What To Do If BP Goes Low)

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून प्या. कारण मीठ रक्तदाब वाढवण्यास मदत करते.

जर डिहायड्रेशनमुळे बीपी लो झाला असेल तर साधं पाणी किंवा इलेक्ट्रॉल पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

अचानक उभं राहू नका किंवा वेगानं हालचालही करू नका. यामुळे चक्कर येऊन पडण्याची भिती असते.

चहा किंवा कॉफी घेतल्यानं रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. अनेकदा डिहायड्रेशनमुळे बी.पी लो होतं. यामुळे पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

जरअशक्तपणामुळे बी. पी लो झाला असेल तर डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा खा किंवा मीठ लावलेले पदार्थ खाल्ल्यानंही फायदा होतो.

तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. ५ ते ६ तुळशीची पानं चावून खाल्ल्यानं किंवा त्याचा रस मधासोबत घेतल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो.

















