आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष

क्रुणाल पांड्याची खास पोस्ट चर्चेत

By सुशांत जाधव | Updated: May 11, 2026 19:36 IST2026-05-11T19:24:14+5:302026-05-11T19:36:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Krunal Pandya Battle Scars Photo Goes Viral Aafter 73 Runs RCB Beat MI Fans Salute Him | आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष

आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष

Viral Krunal Pandya Battle Scars Photo Goes Viral : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आयपीएल २०२६ मधील थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या चेंडूवर २ विकेट्स राखून पराभूत केले. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर रंगलेल्या सामन्यात क्रुणाल पांड्याच्या जिगरबाज खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे. आता त्यात क्रुणालने शेअर केलेल्या खास फोटोचीही भर पडली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्रुणाल पांड्या फक्त स्नायू दुखापतीने त्रस्त नव्हता, तर तो पोटावरील जखमेच्या वेदना सहन करत मैदानात झुंज देत होता. खुद्द RCB च्या अष्टपैलू खेळाडूनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्या जखमेची कहाणी सांगितली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्रुणाल पांड्याची खास पोस्ट

रायपूरच्या फलंदाजांसाठी प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर क्रुणाल पांड्या याने ४६ चेंडूत ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजीदरम्यान पायात गोळे आल्यामुळे तो वेदनेने त्रस्त दिसत होता. मात्र, अशा परिस्थितीतही त्याने जिगरबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आता त्याची खास पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. क्रुणालनं पोटावरील दुखापतीच्या खुणा दाखवत एक फोटो शेअर केला असून त्याला खास कॅप्शनही दिलं आहे. "काही जखमा या त्या लढाईचं प्रमाण असतात, जिच्यासाठी लढणं योग्य होतं," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.

RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"

टीम इंडियात कमबॅकसाठी ठोकली दावेदारी

क्रुणाल पांड्या हा बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेऊन त्याने आयपीएलमध्ये आपली खास छाप सोडली आहे. तो RCB च्या ताफ्यातून खेळताना सातत्याने अष्टपैलू कामगिरीसह आपल्यातील धमक दाखवून देत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे.  

Web Title : क्रुणाल पांड्या की 'जख्मी शेर' वाली तस्वीर, जुझारू पारी के बाद चर्चा में।

Web Summary : क्रुणाल पांड्या ने चोट के बावजूद मैच में साहस दिखाया। उन्होंने पेट के घाव की तस्वीर साझा करते हुए कहा, "कुछ निशान साबित करते हैं कि लड़ाई लड़ने लायक थी।" उनके प्रदर्शन से वापसी की उम्मीदें जगी हैं।

Web Title : Krunal Pandya's 'battle scars' photo grabs attention after fighting innings.

Web Summary : Krunal Pandya's fighting spirit shone despite injury during a match. He shared a photo of his stomach wound, saying, "Some scars prove the battle was worth fighting." His performance fuels comeback hopes.