RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"

स्नायू दुखापतीनं त्रस्त असताना क्रुणाल पांड्याची जिगराबज खेळी; MI संदर्भात व्यक्त केली मनातील भावना

By सुशांत जाधव | Updated: May 11, 2026 01:37 IST2026-05-11T01:34:53+5:302026-05-11T01:37:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RCB vs MI Best six years Krunal Pandya gets emotional remembering Mumbai Indians journey with Hardik Pandya and Kieron Pollard | RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"

RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"

Krunal Pandya Gets Emotional Remembering Mumbai Indians Journey : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ५४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २ विकेट्सने थरारक पराभव केला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत RCB गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. तर या पराभवासह मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात RCB साठी जिगरबाज खेळी करणारा क्रुणाल पांड्या हिरो ठरला. सामना संपल्यानंतर त्याने आपल्या जुना संघ मुंबई इंडियन्सबद्दल भावूक प्रतिक्रिया देत पराभवाच्या जखमेवर फुंकर घालणारे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्नायू दुखापतीनं त्रस्त असताना क्रुणाल पांड्याची  जिगराबज खेळी

अल्प धावांचा पाठलाग करताना संघ अडचणीत असताना क्रुणाल पांड्या स्नायू दुखापतीनं त्रस्त असताना जिद्दीनं लढला अन् संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर त्याने ज्या मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर काढण्यात पुढाकार घेतला त्या संघासोबतच्या जुन्या आठवणींत भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करताना सामना रंगतदार अवस्थेत असताना क्रुणाल पांड्या स्नायू दुखापतीमुळे त्रस्त दिसला. षटकार मारल्यानंतर तो वेदनेनं व्याकूळ होऊन मैदानावर पडला. मात्र स्वतःला सावरत पुन्हा उभा राहून त्याने फलंदाजी सुरू ठेवली. याबद्दल तो म्हणाला की, "मला खूप क्रॅम्प्स येत होते. सुरुवात पायापासून झाली. मग पाठीतही वेदना जाणवू लागल्या. पण संघासाठी ते दोन गुण महत्त्वाचे होते. मला कठीण परिस्थितीत फलंदाजी करायला आवडतं," असं तो म्हणाला. 

IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT

MI सोबतच्या जुन्या आठणींना उजाळा, नेमक काय म्हणाला क्रुणाल?

MI च्या विजयातील अडथळा ठरलेल्या क्रुणाल पांड्याने एकतर्फी झुंज देताना ७३ धावांची जिगरबाज खेळी केली.  या खेळीनंतर क्रुणाल पांड्यानं जुन्या फ्रँचायझी संघातील माजी सहकारी किरॉन पोलार्ड आणि भाऊ हार्दिक पांड्या यांच्याबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. सामन्यानंतर तो म्हणाला की, पॉली (पोलार्ड) माझा मोठा भाऊ आहे. मुंबई इंडियन्ससोबतची सहा वर्षं माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. पांड्या ब्रदर्स आणि पोलार्ड हे संघाचं इंजिन रूम होते. पोलार्ड हा एक चांगला माणूस आणि टी-२० क्रिकेटमधील GOAT आहे. त्याने अनेक सामने आणि ट्रॉफी जिंकल्या आहेत."

क्रुणाल पांड्यानं तीन वेळा MI च्या संघाकडून जिंकलीये IPL ट्रॉफी  

 
क्रुणाल पांड्याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडूनच आयपीएल पदार्पण केले होते. २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये तो IPL विजेत्या मुंबई इंडियन्स संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू होता. २०२५ मध्ये त्याने RCB सोबत IPL ची चौथी ट्रॉफी जिंकली. गत हंगामाप्रमाणे यंदाही या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करताना दिसतोय.


 

 

Web Title : RCB की जीत के बाद क्रुणाल ने MI को याद किया: 'सर्वश्रेष्ठ समय'

Web Summary : क्रुणाल पांड्या ने एमआई के खिलाफ आरसीबी के लिए महत्वपूर्ण पारी खेली, जिससे जीत सुनिश्चित हुई। क्रैम्प के बावजूद, वह दृढ़ रहे। मैच के बाद, क्रुणाल ने मुंबई इंडियंस के साथ बिताए अपने समय को याद करते हुए इसे 'सर्वश्रेष्ठ' बताया और पोलार्ड की प्रशंसा की।

Web Title : Krunal's Emotional MI Tribute After RCB Victory: 'Best Time'

Web Summary : Krunal Pandya played a crucial innings for RCB against MI, securing a win. Despite cramps, he persevered. Post-match, Krunal fondly recalled his time with Mumbai Indians, calling it the 'best' and praising Pollard.