छोट्या आणि मोठ्या मंगळसुत्रांचा सेट-पाहा १२ ट्रेंडी सुंदर डिझाइन्स-लग्नकार्यासह सर्वच सोहळ्यांसाठी खास दागिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:49 IST2026-04-16T12:31:29+5:302026-04-16T13:49:15+5:30

Latest Mangalsutra Designs (Mangaslutra Designs For Wedding) : नवी फॅशन, नव्या डिझाइन्स.

लग्नसराईत मोठ्या आणि छोट्या मंगळसुत्रांना बरीच मागणी असते. मोठ्या आणि छोट्या मंगळसुत्रांचा सेट तुम्हाला खास लूक देईल. (Small And Big Mangalsutra Set)

रोज वापरण्यासाठी लहान मंगळसूत्र आणि कुठे बाहेर जाण्यासाठी मोठं मंगळसूत्र हे कॉम्बिनेशन प्रत्येक महिलेकडे तुम्हाला दिसेलच. (Latest Mangalsutra Designs)

साडी नेसल्यानंतर छोट्या आणि मोठ्या मंगळसुत्राचे कॉम्बिनेशन एक पारंपारीक लूक आणि मॉडर्न टच देईल.

मंगळसुत्राचे हे नवीन पॅटर्न्स तुमच्या साडी लूकची शोभा वाढवतील. या मंगळसुत्रात तुम्ही हव्यातशा पेंडंटची निवड करू शकता.

जर मोठं मंगळसूत्र वाटीच्या पेंडंटचे असेल तर छोटं मंगळसूत्र तुम्ही स्टायलिश डिजाईनचं जसं की हॉर्ट शेप, ट्रँगल शेपचं बनवू शकता.

५ ते ६ ग्रॅममध्ये तुम्हाला नाजूक नवीन डिझाइनचं छोटं मंगळसूत्र मिळेल तर १५ ते २० ग्रॅममध्ये तुम्ही मोठं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.

मंगळसुत्रात नाजूक पट्ट्या किंवा बारीक लेससारख्या डिझाईन्स तुम्हाला सुंदर लूक देतील.

मंगळसुत्रांचे सुंदर डिझाईन्स तुम्हाला कमीत कमी ग्रॅमममध्ये बनवून घेता येतील. काळ्या मण्यांची संख्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

जर तुम्हाला आर्टिफिशयल मंगळसुत्रांचे सेट्स हवे असतील तर त्यातही तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.

सध्या फ्लोरल आणि ज्यॉमेट्रिक डिझाईन्स खूपच चर्चेत आहेत. सोन्यासोबतच रोज गोल्ड आणि प्लॅटिनममधील मंगळसुत्रही बाजारात उपलब्ध आहेत.

लग्नासाठी जड आणि लांब मंगळसूत्र घ्या. तर प्रवासासाठी किंवा रोजच्या कामासाठी लहान आणि लाईटवेट मंगळसूत्र सोयीचे ठरते.

जर तुमचा चेहरा गोल असेल तर लांब मंगळसूत्र तुम्हाला शोभून दिसेल. जर चेहरा लांबट असेल तर आखूड किंवा गळ्यालगतचे मंगळसूत्र निवडावे.