तुम्हाला हुशार बनवणाऱ्या ८ सवयी; सगळ्यात प्रभावी, आकर्षक व्यक्तीमत्त्व होण्याच्या सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 16:18 IST2026-05-17T15:36:15+5:302026-05-17T16:18:05+5:30
8 Habits That Will Make You Smarter : विविध विषयांचे अवांतर वाचन केल्यामुळे नवीन विचारांना चालना मिळते आणि ज्ञानाची कक्षा रुंदावते.

माणसाला मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि हूशार बनवण्यासाठी काही गोष्ठींवर भर देणं आवश्यक आहे. (8 Things That Will Make You Smarter)

वाचन
विविध विषयांचे अवांतर वाचन केल्यामुळे नवीन विचारांना चालना मिळते आणि ज्ञानाची कक्षा रुंदावते. (8 Habits That Will Make You Smarter)

नवीन गोष्टी शिकणं
नवीन भाषा, कला, कोडींग यांसारखी नवीन कौशल्य शिकल्यानं मेंदूचे न्युरॉन्स अधिक सक्रीय होतात.

प्रश्न विचारणं
प्रत्येक गोष्टीमागे का आणि कसे असे प्रश्न विचारण्याची सवय ठेवल्यास चौकस बुद्धी वाढीस लागते.

व्यायाम आणि आहार
रोजचा नियमित व्यायाम आणि सकस आहार मेंदूकडील रक्ताभिसरण सुधारून स्मरणशक्ती तीक्ष्ण करतो.

दिवसभरातून चांगली झोप घ्या.
दिवसातून किमान ६ ते ८ तासांची गाठ झोप घेतल्यानं मेंदू रिचार्ज होतो आणि निर्णय क्षमता सुधारते.

आत्मपरिक्षण
रोज ५ ते १० मिनिटं आत्मपरिक्षण किंवा ध्यान केल्यानं मानसिक स्पष्टता येते आणि नकारात्मकता दूर होते.

हूशार लोकांच्या सहवासात राहणं
आपल्यापेक्षा प्रगल्भ आणि हूशार लोकांच्या सहवासात राहिल्यानं वैचारिक पातळी आणि बोलण्याची पद्धत सुधारते.

ज्ञान प्रत्यक्षात आणणं
केवळ माहिती गोळा न करता मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अंमलात आणणं हीच खरी हुशारी ठरते.
















