धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:24 IST2026-05-16T15:23:49+5:302026-05-16T15:24:30+5:30

Video - एक तरुणी पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. पण याच दरम्यान तिला पाणीपुरीत काहीतरी असं आढळले, जे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

ahmedabad food stall bone found in panipuri video viral questions raised over hygiene and quality | धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल

धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल

स्ट्रीट फूडची आवड असणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरातून समोर आलेल्या एका व्हिडिओने स्ट्रीट फूडच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. शहरातील रानीप बस स्टॉपजवळ एक तरुणी पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. पण याच दरम्यान तिला पाणीपुरीत असं काहीतरी आढळलं, जे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पाणीपुरी खाताच तिला तोंडात काहीतरी विचित्र असल्याचं जाणवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या रानीप भागात ‘कृष्णा पाणीपुरी’ नावाचा एक फूड स्टॉल आहे. येथे एक तरुणी रात्रीच्या वेळी पाणीपुरी खाण्यासाठी पोहोचली होती, परंतु तिला पाणीपुरीत हाडाचा एक तुकडा सापडला. हे पाहून ती तरुणी चक्रावून गेली आणि तिने तात्काळ फूड स्टॉल मालकाकडे याबद्दल तक्रार केली. यामुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या निष्काळजीपणाबद्दल तरुणीने फूड स्टॉल मालकाला चांगलंच धारेवर धरलं.

पाणीपुरीत सापडला हाडाचा तुकडा

वादानंतर पाणीपुरी स्टॉल चालकाने माफी मागितली. एवढंच नव्हे तर, त्या तरुणीने संपूर्ण घटनेची माहिती देणारा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये तिने तो हाडाचा तुकडा देखील दाखवला आहे. यानंतर तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला, जो प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर कमेंट करत स्ट्रीट फूड मालकाच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत टीका करत आहेत.

लोकांच्या आरोग्याशी खेळ

स्ट्रीट फूडची स्वच्छता आणि गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने अशा स्टॉल्सवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने स्टॉल चालकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हाडाचा तुकडा स्पष्टपणे दिसत आहे.

Web Title : पानी पुरी में हड्डी का टुकड़ा मिला; वायरल वीडियो से आक्रोश!

Web Summary : अहमदाबाद में एक महिला को पानी पुरी में हड्डी का टुकड़ा मिला। कृष्णा पानी पुरी स्टॉल पर हुई इस घटना के बाद आक्रोश फैल गया और वीडियो वायरल होने के बाद सख्त खाद्य सुरक्षा उपायों की मांग की गई।

Web Title : Bone found in Pani Puri; Viral video sparks outrage!

Web Summary : A woman in Ahmedabad found a bone fragment in her Pani Puri. The incident at Krishna Pani Puri stall led to outrage and calls for stricter food safety measures after the video went viral.