बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 19:25 IST2026-05-16T19:25:01+5:302026-05-16T19:25:37+5:30

थायलंडची राजधानी बँकॉक येथे एका मालगाडीची बसला जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला आहे. यानंतर बसला भीषण आग लागली.

video freight train hits bus at railway crossing in bangkok massive fire erupts at least 8 people dead | बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी

बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी

थायलंडची राजधानी बँकॉक येथे एका मालगाडीची बसला जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला आहे. यानंतर बसला भीषण आग लागली. या अपघातात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. 'इरावन मेडिकल सेंटर'ने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर अपघाताच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मालगाडीने एका ऑरेंज कलरच्या बसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसने लगेचच पेट घेतला. तसेच काही वाहनांना आग लागली. यामध्ये होरपळून बसमधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 

थायलंडचे मंत्री सिरिपॉन्ग अंगकासाकुलकियात यांनी सांगितलं की, सर्व मृतदेह बसच्या आतच सापडले आहेत. अपघात झाला तेव्हा बसमध्ये नेमके किती लोक होते, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बस रेल्वे रुळावरच थांबली होती आणि मालगाडी येत असताना वाहनचालकांना रोखण्यासाठी लावलेले बॅरियर्स खाली आले नव्हते.

किट्टीपॉन्ग रक्सा नावाच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली कार रेल्वे रुळाजवळ उभी केली होती, तेवढ्यात त्यांना ट्रेन येण्याचा इशारा देणारा सिग्नल ऐकू आला. किट्टीपॉन्ग म्हणाले, "मला एक मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर लगेच दुसरा. मला असं वाटलं की माझ्या कारला काहीतरी धडकलं आहे. त्यानंतर मी ट्रेन जाताना पाहिली, जी बसला फरफटत नेत होती." 

Web Title : बैंकॉक में ट्रेन की टक्कर: बस में आग, 8 की मौत, 20 घायल

Web Summary : बैंकॉक में एक ट्रेन ने बस को टक्कर मार दी, जिससे आग लग गई। आठ लोगों की मौत हो गई, और बीस से अधिक घायल हो गए। दुर्घटना के समय बस रेलवे ट्रैक पर थी। प्रत्यक्षदर्शियों ने ट्रेन की आवाज सुनी और उसे बस को खींचते हुए देखा।

Web Title : Bangkok Train Collision: Bus Fire Kills 8, Injures 20

Web Summary : In Bangkok, a train collided with a bus, causing a fire. Eight people died, and over twenty were injured. The bus was on the tracks when the accident occurred. Witnesses reported hearing the train and seeing it drag the bus.