'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 19:13 IST2026-05-16T19:12:16+5:302026-05-16T19:13:55+5:30

परळीत मराठा भवनासाठी धनंजय मुंडेंकडून २८ गुंठे जागा; 'नाथ प्रतिष्ठान'कडून नामफलकाचे अनावरण.

"Misunderstandings are Temporary": Dhananjay Munde Claps Back at Critics After Alloting Land for Maratha Bhavan | 'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर

'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर

परळी (जि. बीड): "मी कधीच जात, पात किंवा धर्म पाळून राजकारण केले नाही. माझ्याविषयी समाजामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज आणि चुकीच्या भावना निर्माण करण्यात आल्या. मात्र, त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. माझा नियतीवर पूर्ण विश्वास असून, माझ्याविषयीचा गैरसमज नियतीच दूर करत आहे," असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले.

परळी शहरात भव्य 'मराठा भवन' उभारण्यासाठी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नंदागौळ रस्त्यावरील वेताळ मंदिराजवळ या मराठा भवन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयाबद्दल मराठा युवा मंचच्या वतीने आमदार मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आंदोलनाला यश, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प
परळीत मराठा भवन व्हावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नगरपरिषदेसमोर तीन दिवस तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत मुंडेंनी तातडीने जागा निश्चित केली. "हे मराठा भवन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल असे उभारले जाईल. तसेच या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत शैक्षणिक प्रकल्प राबविण्याचा आमचा मनोदय आहे," असे मुंडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सेवकराम जाधव, हभप देवराव लुगडे, नितीन शिंदे, शिवाजी देशमुख यांच्यासह मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title : मेरे बारे में गलतफहमी फैलाई: धनंजय मुंडे का विरोधियों को करारा जवाब।

Web Summary : परली में मराठा भवन के लिए जमीन दान करने के बाद धनंजय मुंडे ने पक्षपातपूर्ण राजनीति के आरोपों का खंडन किया। उनका लक्ष्य मराठा छात्रों के लिए एक शैक्षिक परियोजना स्थापित करना है।

Web Title : Misunderstandings spread about me: Dhananjay Munde's sharp reply to opponents.

Web Summary : Dhananjay Munde refutes allegations of biased politics after donating land for Maratha Bhavan in Parli. He aims to establish an educational project for Maratha students.