Photos: पुण्यात अग्नितांडव; जीवाची परवा न करता जवानांची कसरत, आगीची भीषण छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:23 PM2023-06-18T12:23:32+5:302023-06-18T12:37:46+5:30

शहरासह उपनगरात आगीचे सत्र कायम असून गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ तब्बल २०-२५ गौडाऊनला भिषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता घडली. एकापाठोपाठ एक अशी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( सर्व छायाचित्रे - किरण शिंदे )

आगीत गोदामांचे प्रचंड नुकसान

अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु

जवान जीवाची परवा न करता कसरत करून आग विझवताना

परिसरातील आजूबाजूला कुठेही चढून आगीवर नियंत्रण आणताना जवान

भंगारचे गोदाम असल्याने आग वाढत असली तरी जवान विझवण्यासाठी प्रयत्नशील

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु

आग विझवण्यासाठी जवानांना नागरिकही मदत करताना

आगीत नुकसान झालेले पत्रे, भंगारातील वस्तू बाजूला घेताना जेसीबी

आग नियंत्रणात आणण्यासाठी पाहणी करताना जवान

आगीच्या झळा लागल्याने बाजूला येऊन पाणी पिताना जवान