पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:15 IST2026-05-02T17:15:00+5:302026-05-02T17:15:57+5:30

West Bengal Re-polling 2026 : ...यानंतर, आयोगाने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार आज येथे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र यातच जिल्ह्यातील फाल्टा परिसरातून तणावाच्या बातम्या येत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमक्या देत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

West Bengal Re-polling 2026 Big clash during re-polling at 15 centres; TMC-BJP workers clash! Watch video | पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ

पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ

TMC vs BJP Bengal elections : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी, अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानावेळी काही तक्रारी आणि अनियमितता आढळून आली. यानंतर, आयोगाने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार आज येथे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र यातच जिल्ह्यातील फाल्टा परिसरातून तणावाच्या बातम्या येत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमक्या देत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान येथे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये तीव्र वादावादी झाली. स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमकावल्याचे गंभीर आरोप केले. बराच वेळ चाललेल्या या गदारोळानंतर सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष असेल.

१५ केंद्रांवर पुनर्मतदान -
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरून अनियमिततेच्या काही तक्रारी आल्या होता. यानंतर फाल्टा भागात ईव्हीएम मशीनवरील भाजपच्या पर्यायासमोर टेप लावण्यात आल्याची तक्रार भाजपने केला होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत अशा जिल्ह्यातील एकूण १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचे आदेश दिले होते. यात मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ आणि डायमंड हार्बरमधील ४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

केंद्रीय सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात -
सकाळी ७ वाजता सुरू झाले. ११ वाजेपर्यंत साधारण ३७ टक्के मतदान नोंदवले गेले. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मतदारसंघांत सध्या मतदान शांततेत सुरू आहे. कोणतीही मोठी हिंसक घटना समोर आलेली नाही. केंद्रीय सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. वेबकास्टिंगच्या माध्यमातून सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.

या पुनर्मतदानामध्ये मगराहाट पश्चिममधून टीएमसीचे मोहम्मद समीम अहमद मोल्ला आणि भाजपचे गौर सुंदर घोष यांच्यात मुख्य लढत आहे. तर डायमंड हार्बरमध्ये टीएमसीचे पन्ना लाल हलदर आणि भाजपचे दीपक कुमार हलदर यांच्यात मुख्य लढत आहे.

 

Web Title : पश्चिम बंगाल: पुनर्मतदान में हंगामा; टीएमसी-भाजपा कार्यकर्ताओं में झड़प!

Web Summary : बंगाल के दक्षिण 24 परगना में पुनर्मतदान के दौरान टीएमसी और भाजपा कार्यकर्ताओं में झड़प हुई। धमकाने के आरोप लगे। सुरक्षा बलों ने हस्तक्षेप किया; तनाव बरकरार है। 4 मई को मतगणना।

Web Title : West Bengal: Ruckus during repoll; TMC-BJP workers clash!

Web Summary : Repolling in Bengal's South 24 Parganas saw clashes between TMC and BJP workers. Allegations of intimidation surfaced. Security forces intervened; tensions remain. Counting on May 4th.