India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?

स्टार ऑलराउंडर भारतीय संघातून बाहेर

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 17:19 IST2026-05-02T17:16:44+5:302026-05-02T17:19:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India Women's T20 World Cup 2026 Squad: Team India announced for T20 World Cup; Who got a chance? | India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?

India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?

India Women's T20 World Cup 2026 Squad Announced : इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात महिला निवड समितीच्या अध्यक्षा अमिता शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या बैठकीनंतर  बीसीसीआयचे सचिव देवजित साकिया यांनी हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्टार ऑलराउंडर संघाबाहेर, या नव्या चेहऱ्याला मिळाली पहिली संधी 

१२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. वनडेतील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.  भारतीय महिला संघाला फिल्डिंगच्या जोरावर वनडेत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारी अमनजोत कौर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग नाही. दुखापतीमुळे तिला संघात स्थान मिळाले नाही.  याशिवाय WPL मधील दिल्लीच्या संघाकडून हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या नंदिनी शर्माला वर्ल्ड कप खेळण्याची पहिली संधी मिळाली आहे.  

तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?

महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, श्रेयंका पाटील. भारती फुलमाली , दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यश्तिका भाटिया, नंदीनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, राधा यादव, रेणुका ठाकूर

Web Title : भारतीय महिला टी20 विश्व कप 2026 टीम घोषित: टीम का खुलासा

Web Summary : इंग्लैंड में 2026 महिला टी20 विश्व कप के लिए भारतीय टीम की घोषणा। हरमनप्रीत कौर टीम का नेतृत्व करेंगी, जिसमें स्मृति मंधाना, शेफाली वर्मा और अन्य शामिल हैं। भारत को ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान और दक्षिण अफ्रीका के साथ रखा गया है।

Web Title : India Women's T20 World Cup 2026 Squad Announced: Team Revealed

Web Summary : India's squad for the 2026 Women's T20 World Cup in England is announced. Harmanpreet Kaur captains the team, featuring Smriti Mandhana, Shafali Verma, and others. India is grouped with Australia, Pakistan, and South Africa.