देशातील सर्वात वाईट भाषा कोणती? Googleच्या उत्तरानं उद्भवला वाद; नाराजीनंतर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:05 PM2021-06-04T17:05:37+5:302021-06-04T17:17:54+5:30

गूगलने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे, की सर्च रिझल्ट नेहमीच परफेक्ट नसतात. ज्या पद्धतीने कंटेंटसंदर्भात सांगितले जाते, अनेक वेळा, ते एखाद्या स्पेसिफिक क्वेरीच्या रिझल्टमध्येही दिसते. हे योग्य नाही, पण अशा गोष्टी निदर्शनास येताच आम्ही त्यावर तत्काळ अॅक्शन घेत असतो. (Which is the ugliest language in India? Google apologises for kannada being search result )

भारतातील सर्वात वाईट भाषा कन्नड (kannada language) असल्याचे दर्शवल्यानंतर Google ने माफी मांगीतली आहे. Google वर ugliest language in India सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर Google ने माफी मागितली आहे. (Which is the ugliest language in India? Google apologises for kannada being search result )

माफी मागताना Google India ने म्हटले आहे, गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनी दिलगीर आहे. Google सातत्याने आपला algorithms चांगला करण्यासाठी काम करत आहे.

याच बरोबर, सर्च इंजिन रिझल्ट कंपनीचे मत दर्शवत नाही, असेही Google India ने म्हटले आहे.

गूगलने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे, की सर्च रिझल्ट नेहमीच परफेक्ट नसतात. ज्या पद्धतीने कंटेंटसंदर्भात सांगितले जाते, अनेक वेळा, ते एखाद्या स्पेसिफिक क्वेरीच्या रिझल्टमध्येही दिसते. हे योग्य नाही, पण अशा गोष्टी निदर्शनास येताच आम्ही त्यावर तत्काळ अॅक्शन घेत असतो.

साहजिकच, हे Google चे मत नाही. Google India ने आपला माफीनामा कन्नड भाषेतही जारी केला आहे.

तत्पूर्वी, 3 जूनला अनेक लोकांनी या सर्च रिझल्टवर आक्षेप घेतला होता.

दक्षिण भारतात जवळपास 40 मिलियन लोक कंन्नड भाषा बोलतात.

हा सर्च रिझल्ट एका वेबसाइटमुळे येत होता.

हे प्रकरण सोशल मिडियावरून समोर आल्यानंतर खासदार PC Mohan यांनी गूगलला माफी मागायला सांगितले होते.

यासंदर्भात, आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद गौडा (Mukund Gowda) यांनीही गूगल इंडियाला पत्र लिहिली होते.

Read in English