हॉस्टेलमध्ये सापडले वापरण्यात आलेले कंडोम, IIT विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 03:17 PM2018-12-04T15:17:29+5:302018-12-04T15:24:35+5:30

आयआयटी मद्रास येथील एका विद्यार्थ्याचे कथितरित्या नोटीस बोर्डवर नाव छापण्यात आले. या विद्यार्थ्याच्या हॉस्टेल रुममध्ये वापरण्यात आलेले कंडोम सापडले. याप्रकरणी त्याला पाच हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण गेल्या आठवड्यातील आहे. आयआयटी मद्रासच्या ब्रम्हपुत्र हॉस्टेलमध्ये तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या रुममधून बंदी घालण्यात आलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये आयरन बॉक्स, इलेक्ट्रिक केटल, वॉटर कूलर, मिनी फ्रिज, वॉटर हिटर रॉड होते. मात्र, एका रुमध्ये 20 सिगरेट बट्स, मॅचबॉक्स आणि वापरण्यात आलेले कंडोम आढळले. रिपोर्टनुसार, ज्या विद्यार्थ्याच्या रुमध्ये सिगरेट बट्स, मॅचबॉक्स आणि वापरण्यात आलेले कंडोम सापडले. त्या विद्यार्थ्याचे नाव नोटीस बोर्डवर छापले आहे.

याप्रकरणी विद्यार्थ्यांनी सांगितले की, कोणाचीही परवानगी न घेता विजिलेंट ऑफिसरने फोटो काढले आणि अपमान केला. तसेच, याप्रकरणी विद्यार्थ्यांनी खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा आरोप फेटाळत संबंधित विद्यार्थ्याचे नाव नोटिस बोर्डवर छापले नसल्याचे म्हटले आहे.