कोल्हापुरातील शाही दसरा सोहळ्याचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 10:39 PM2017-09-30T22:39:20+5:302017-09-30T22:45:05+5:30

पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला. यावेळी शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन झाले. यावेळी खासदार संभाजीराजे,यशराजराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे उपस्थित होते.

यंदा शाहू छत्रपतींसोबत, यशराजराजे, शहाजीराजे व यशस्विनीराजे यांचे मेबॅक कारमधून दसरा चौकात आगमन झाले.

पावसाच्या सरी झेलत सोनं लुटताना कोल्हापूरकर.

सिमोल्लंघन सोहळ्यानंतर मेबॅक कारमधून कोल्हापूरकरांना सोनं देताना शाहू छत्रपती.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती सुवर्णपालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी दसरा चौकात गेली (फोटो - आदित्य वेल्हाळ)

विजयादशमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या अंबाबाईची विजयोत्सव साजरा करण्यासाठी रथावर आरुढ झालेल्या रुपात पूजा बांधण्यात आली