एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:44 AM2020-05-16T11:44:59+5:302020-05-16T12:08:49+5:30

किम यांच्या बाबत मोठी आणि तेवढीच खासगी गोष्ट समोर आली आहे. किम जोंग उन स्वित्झर्लंडच्या शाळेत शिक्षण घेत होते. मात्र, तेथून त्यांच्या कोरियामध्ये परत येण्याच्या रहस्याचा भेद झाला आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन गेल्या महिन्यात कोरोनापेक्षाही जास्त चर्चेत होता. या हुकूमशहाचा मृत्यू झाल्याच्या चर्चा जगभरात रंगल्या होत्या. एवढेच नाही तर त्याचा उत्तराधिकारी कोण असेल हे देखील जगाने ठरवून टाकले होते. तसेच त्याच्या मृत्यूची कधी आणि कशी घोषणा होणार हे देखिल वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, किमचा ठणठणीत असल्याचा व्हिडीओ आला आणि सारे शांत झाले.

आता किम यांच्या बाबत मोठी आणि तेवढीच खासगी गोष्ट समोर आली आहे. किम जोंग उन स्वित्झर्लंडच्या शाळेत शिक्षण घेत होते. मात्र, तेथून त्यांच्या कोरियामध्ये परत येण्याच्या रहस्याचा भेद झाला आहे.

आता उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा मुलगा परदेशात शिकायला गेलाय म्हटल्यावर त्याच्यावर अमेरिकेसारख्या देशांचीही नजर असणार. यामुळे किम जोंग उनच्या वडिलांनी गुप्तहेर आणि दूरूनच त्याच्यावर नजर ठेवणारी माणसे नेमली होती. या गुप्तहेरांना आक्षेपार्ह बाबी आढळल्यानेच किम यांना पुन्हा उत्तर कोरियात परतावे लागले होते. वाचा किम जोंग उनची खासगी गोष्ट.

किम जोंग उन १९९० च्या दशकामध्ये स्वित्झर्लंडच्या बर्नमधील एका खासगी शाळेमध्ये शिक्षण घेत होते. त्यांचे वडील किम जोंग इल यांनी हे गुप्तहेर पाठविले होते. या गुप्तहेरांना किमच्या खोलीमध्ये पॉर्न मॅगझिन सापडले होते. गुप्तहेरांनी याची माहिती इल यांच्या कानावर घातली. आता हुकूमशहाच तो.

इल यांनी तातडीने किम जोंग उनला शाळा सोडायचे आदेश दिले आणि मायदेशात परतण्याचे फर्मान सोडले. हुकूमशहा आणि बाप अशा दोन भूमिकांमध्ये ते पुरते अडकले.

इल यांना मुलगा बिघडण्याची चिंता सतावत होती. पश्चिम देशांतील या अश्लिल गोष्टींमुळे मुलगा वाईट नादाला लागेल. इल यांना चार मुले होती. त्यांची क्षणोक्षणीची अपडेट इल यांच्यापर्यंत हे गुप्तहेर पोहोचवत असत.

चारही मुलांची ओळख लपविण्यात आली होती. त्यांना उत्तर कोरियाच्या परदेशातील अधिकाऱ्यांची मुले म्हणून या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला होता. खरेतर तेथील शिक्षकांना किम यांच्यावर एक मोठा संशय होता.

किम परिक्षेमध्ये चांगले मार्क न मिळाल्याने चिटिंग करतात अशी शंका या शिक्षकांना आली होती. यामुळे त्यांची खोली तपासण्यात आली होती.

यावेळी ही पॉर्न मॅगझिन सापडली होती. मात्र, हे प्रकरण शाळेपर्यंतच न राहता गुप्तहेरांच्या नजरेत आले आणि किम यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला.

किम यांचे बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेल्याने त्यांना स्विस बनावटीच्या वस्तूंची प्रचंड आवड आहे. त्यांचे तेव्हाचे वर्गमित्र जोआओ मायकल सांगतात की, आम्ही दोघे खूप मस्ती करत असायचो. किम खूप चांगला होता. ते दुसऱ्या मुलांसोबत चांगले वागायचे.

बास्केटबॉलही त्यांना आवडत होता. स्वीस वस्तू त्यांना एवढ्या आवडतात की ते उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांना महागडी स्विस घडाळ्यांसह अनेक भेटवस्तू देत असतात.

पण किम यांच्या या एका चुकीमुळे त्यांच्या तिनही भावंडांना परदेशातील शिक्षण, सगेसोबती सर्वांना सोडून उत्तर कोरियात परतावे लागले होते.

Read in English