जगभरात कोरोना व्हायरसने किती घेतले बळी? जाणून घ्या आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:43 PM2020-03-14T16:43:24+5:302020-03-14T17:09:24+5:30

जगभरात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरला आहे. अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सांगणार आहोत. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकूण ३१९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या चीनमध्ये सर्वाधिक आहे.

इटलीमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १२६६ इतकी आहे.

इराणमध्ये कोरोना व्हायरसने ५१४ लोकांचा बळी घेतला आहे.

स्पेनमध्ये १३३ मृत्यू झाले आहेत.

फ्रान्समध्ये आतापर्यंत ७९ मृत्यू झाले आहेत.

दक्षिण कोरीयात ७२ लोकांचा कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अ़डकून मृत्यू झाला.

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० आहे.

जपानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २१ आहे.

युनाईडेट किंगडममध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ आहे. ( image credit- daily express)