भारतीय क्रिकेटपटूंचे फुटबॉल प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:28 AM2018-08-27T09:28:25+5:302018-08-27T09:31:46+5:30

भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी फावल्या वेळेत फुटबॉल सामन्यांचा आस्वाद लुटला. संघातील काही खेळाडूंनी इंग्लिश प्रीमिअर लीगचे सामने पाहिले आणि क्लबच्या खेळाडूंशीही चर्चा केली.

इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी आर्सेनल आणि वेस्ट हॅम यांच्यातील फुटबॉल सामना पाहण्यासाठी लोकेश राहुलने थेट मैदानात हजेरी लावली.

त्यानंतर राहुलने 2018च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू कांटेची भेट घेतली. विश्वचषक स्पर्धेतील अनुभवाबद्दल राहुलने कांटेशी चर्चा केली.

सामना पाहुनच भारतीय खेळाडू थांबले नाही, तर त्यांनी फुटबॉल खेळण्याचीही मजा लुटली.

येथील एमिरेट्स स्टेडियमवर राहुल आणि उमेश यादव यांनी फुटबॉलवर कौशल्य दाखवले.

भारताचा प्रमुख गोलंदाज जस्प्रीत बुमरा याने स्टेडियमबाहेर फोटोसेशन केले.