Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
By कोमल खांबे | Updated: May 5, 2026 10:31 IST2026-05-05T10:18:13+5:302026-05-05T10:31:51+5:30
रितेश देशमुखची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'राजा शिवाजी'ने ४ दिवसांतच धुव्वा उडवला, किती कोटींची कमाई?

Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'राजा शिवाजी' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर थिएटरही हाऊसफूल झाल्याचं दिसलं. आता या सिनेमाचं ४ दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे.

'राजा शिवाजी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटींचा गल्ला जमवला. मराठीत ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला.

तर दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींची कमाई रितेशच्या 'राजा शिवाजी'ने केली. तिसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत वीकेंडला २२.५५ कोटींचा गल्ला कमावला.

मंडे टेस्टमध्येही 'राजा शिवाजी' सिनेमा पास झाला आहे. सोमवारी सिनेमाच्या कमाईत घट झाली असली तरी 'राजा शिवाजी'ने ५.६० कोटींचा बिजनेस केला आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांतच रितेश देशमुखच्या सिनेमाने ३९ कोटी कमावले असून सिनेमाची ५० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

'राजा शिवाजी' सिनेमा मराठीतला ब्लॉकबस्टर ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१०० कोटींचं बजेट असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा पहिल्यांदाच मराठीत इतक्या मोठ्या स्केलवर बनला आहे.

या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन, संजय दत्त हे बॉलिवूड कलाकार झळकले आहेत.

'राजा शिवाजी' सिनेमात मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत.
















